Shocking: 'माझ्याकडे बघून तो हस्तमैथुन..' टेरेसवर तरूणाचे अश्लील चाळे, फोटो व्हायरल करत तरूणी म्हणाली..

latest crime news: अलिकडेच एका महिलेनं तिच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगाबाबत माहिती सोशल मीडियावर शेअर करत दिली. तिने एका पोस्टमध्ये आपल्याकडे बघून एक पुरूष हस्तमैथुन करत असल्याचं तिने सांगितलं.
Crime
CrimeSaam
Published On

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या भावना, विचार आणि अनुभव शेअर करत असतात. अलीकडेच एका महिलेने स्वतःच्या आयुष्यात घडलेला अत्यंत लाजिरवाणा अनुभव शेअर केला असून, त्या पोस्टमुळे समाज माध्यमांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेनं दावा केला आहे की, समोरच्या इमारतीतील एक पुरुष तिच्याकडे पाहून हस्तमैथुन करत होता. या घटनेचे फोटोही तिने शेअर केले आहेत. या पोस्टवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, ती आपल्या घराच्या टेरेसवर गेली असताना समोरच्या इमारतीवर एक अनोळखी पुरुष उभा होता. "सुरुवातीला वाटलं की हा एक योगायोग असेल, पण जेव्हा तो न थांबता एकटक माझ्याकडेच पाहू लागला, तेव्हा मला अस्वस्थ वाटू लागलं," असं तिने लिहिलं.

Crime
Highway Video: हायवेवरच शरीरसंबंध ठेवणाऱ्या नेत्यासह त्या महिलेचे आणखी २ व्हिडिओ व्हायरल; रस्त्यावरच नग्नावस्थेत नाचत होते...

तिने स्थान बदलून नजरेपासून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळाने तिला दिसून आलं की तो पुरुष तिच्याकडे पाहत असताना हस्तमैथुन करत होता. "सुरुवातीला मला धक्का बसला, विश्वासच बसला नाही. पण जेव्हा काय घडतंय याची जाणीव झाली, तेव्हा मी त्याचे काही फोटो काढले," असं तिने नमूद केलं. "मी पूर्ण कपडे घातले होते, काहीही भडक नव्हतं. मी केवळ माझ्या घराच्या टेरेसवर उभी होते. तरीही ही घटना घडली आणि त्यामुळे मला भीती, किळस आणि लाज वाटू लागली," असंही तिने सांगितलं.

तरूणीने आपल्या पोस्टमध्ये घरच्यांना - पोलिसांना सांगण्यास भीती वाटत असल्याचं सांगितलं, "मला माझ्या कुटुंबाला सांगायला भीती वाटते, कारण ते जास्त काळजीतून मला टेरेसवर एकटं जाण्यापासून रोखतील. पण मला माझं स्वातंत्र्य गमवायचं नाही. मी सध्या पोलिसांनाही बोलवू इच्छित नाही कारण घरच्यांना समजण्याची भीती वाटते. पण मला या गोष्टीकडे दुर्लक्षही करायचं नाही," असं तिने नमूद केलं.

Crime
Ajit Pawar: दादांनी दिला १० हजारांचा वादा! ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना आर्थिक मदत; अजित पवारांची घोषणा

या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला. एकाने, "तुम्ही महिला पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क करा, तुमच्या मित्रासोबत जा आणि गुन्हा गुप्त ठेवून नोंदवा. प्लीज गप्प बसू नका." तर, दुसऱ्याने हस्तमैथून करणाऱ्या तरूणावर संताप व्यक्त केला. ही घटना नेमकी कोणत्या परिसरातील आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com