Vastu Tips for Money: खिशात पैसा टिकत नाहीये? या वास्तू टीप्स तुमच्या येतील कामी

Home vastu changes for financial growth: पैसे येतात पण टिकत नाहीत? अनावश्यक खर्च थांबवण्यासाठी आणि धनवृद्धीसाठी सोपे आणि प्रभावी वास्तु उपाय जाणून घ्या.
vastu tips for money
vastu tips for moneysaam tv
Published On

तुमच्याकडेही पैसे टिकत नाहीत? तुमच्याकडे पैसे आले की लगेच खर्च होतात...असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्ही काही वास्तू टीप्सचा वापर केला पाहिजे. कधीकधी, चांगले पैसे कमवूनही काही लोकांकडे ते नसतात. अशा परिस्थितीत, ही परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही काही वास्तु टिप्स अवलंबू शकता.

अनावश्यक खर्च थांबतील

वास्तुशास्त्रात पैसे आणि दागिने साठवण्याची योग्य दिशा देखील सांगण्यात आली आहे. म्हणून तुम्ही तुमचे पैशांचं पाकिट किंवा तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवावी. तुम्ही तिजोरीत लाल कापड देखील ठेवू शकता आणि त्यात श्रीयंत्र किंवा चांदीचे नाणं ठेवू शकता. या पद्धतीमुळे तिजोरी कधीही रिकामी होत नाही आणि अनावश्यक खर्च देखील कमी होतो.

vastu tips for money
Vastu Tips : पावसामुळे Work From Home करताय; ५ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा येतील अडचणी

उत्तर दिशेचं महत्त्व

वास्तुशास्त्रात, उत्तर दिशेला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ही दिशा संपत्तीचं प्रवेशद्वार मानली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजं. यामुळे देवी लक्ष्मीची उपस्थिती तुमच्या घऱात राहते.

त्याचप्रमाणे तुमच्या घरात संपत्तीची देवता भगवान कुबेरची मूर्ती किंवा फोटो उत्तरेकडे ठेवावेा. या दिशेने तिजोरी किंवा कपाट देखील ठेवावं. यामुळे संपत्ती आकर्षित होते.

vastu tips for money
Kitchen Vastu Tips: स्वयंपाकघरात पाण्याची भांडी कोणत्या दिशेला ठेवावीत?

देवी लक्ष्मीला करा प्रसन्न

देवी लक्ष्मीची पूजा करणं हा धनप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग मानण्यात येतो. त्यामुळे जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर तुम्ही काही वास्तु नियम लक्षात ठेवले पाहिजेत. तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

vastu tips for money
Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये चुकूनही अशा टाईल्स वापरू नका; घरात कलह होण्याची वाढते शक्यता

त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तिला कमळाचं फूल अर्पण करा. असं केल्याने व्यक्तीला धन आणि समृद्धी मिळू लागते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मुख्य दरवाजावर दिवा लावा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com