Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये चुकूनही अशा टाईल्स वापरू नका; घरात कलह होण्याची वाढते शक्यता

Which kitchen tiles to avoid as per vastu: वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात चुकीच्या टाइल्स वापरल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. कोणते रंग आणि डिझाइन टाळावेत आणि योग्य पर्याय कोणते हे जाणून घ्या.
Which kitchen tiles to avoid as per vastu
Which kitchen tiles to avoid as per vastuSAAM TV
Published On

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर ही घरातील सर्वात महत्वाची जागा असते. ज्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य, ऊर्जा यांची काळजी घेतली जाते. शास्त्रांमध्ये स्वयंपाकघर हे अग्नि तत्वाचं स्थान मानलं जातं. त्याठिकाणी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचा घराच्या वातावरणावर परिणाम होतो.

शास्त्रानुसार, स्वयंपाकघरात चुकीच्या टाइल्स निवडल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. इतकंच नाही तर यामुळे नातेसंबंधांवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्वयंपाकघर बनवताना या तीन प्रकारच्या टाइल्स टाळणं अत्यंत महत्वाचं आहे.

काळ्या रंगाच्या लाईट्स

जर तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर सकारात्मक उर्जेने भरलेलं ठेवायचं असेल तर काळ्या किंवा खूप गडद टाइल्स वापरणं टाळा. वास्तुशास्त्रानुसार, हे रंग नकारात्मकतेला प्रोत्साहन देतात. ज्यामुळे कुटुंबात तणाव आणि वाद निर्माण होऊ शकतात. त्याऐवजी तुम्ही क्रीम, ऑफ-व्हाइट असे हलक्या रंगाचे टाईल्स वापरू शकता.

Which kitchen tiles to avoid as per vastu
Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

या डिझाइनच्या टाइल्स वापरा

'क्रॅक-इफेक्ट' टाइल्स बाजारात वाढत्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र त्या स्वयंपाकघरांसाठी शुभ मानल्या जात नाहीत. क्रॅक हे अस्थिरता आणि तुटण्याचं प्रतीक आहेत. अशा टाइल्स कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणं आणि मानसिक ताण निर्माण करू शकतात. वास्तुनुसार, स्वयंपाकघरात नेहमी साध्या आणि साध्या डिझाइनच्या टाइल्स लावाव्यात.

चमकदार टाइल्स वापरणं टाळा

चमकदार टाइल्स दिसायला चांगल्या दिसतात. परंतु स्वयंपाकघरात जास्त वापरणं योग्य नाही. त्यांची तीव्र चमक डोळ्यांवर आणि मनावर नकारात्मक परिणाम करू शकते. वास्तुशास्त्रात असं म्हटलंय की, जास्त चमकदार गोष्टी मानसिक अस्वस्थता आणि ताण वाढवतात.

Which kitchen tiles to avoid as per vastu
Common Mistakes Using iPhone: Apple चा युजर्सला सर्तकतेचा इशारा! ही चुक चूकनही करु नका, अन्यथा पैसै जातील पाण्यात

स्वयंपाकघरातील वास्तूविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

  • चुलीसाठी योग्य दिशा आग्नेय मानली जाते

  • गॅस आणि सिंक एकमेकांसमोर ठेवू नका

  • स्वयंपाकघरात हलके आणि उबदार रंग वापरा

  • कचरा आणि घाण साचू देऊ नका

Which kitchen tiles to avoid as per vastu
Evening Diya Rules: दररोज संध्याकाळी घरी दिवा लावताय ना? नकळत होणाऱ्या या चुका टाळा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com