Evening Diya Rules: दररोज संध्याकाळी घरी दिवा लावताय ना? नकळत होणाऱ्या या चुका टाळा

How to light diya correctly at sunset: संध्याकाळी दिवा लावण्याची योग्य वेळ, दिशा आणि पद्धत काय आहे? तूपाचा की तेलाचा दिवा लावावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि वास्तुनुसार दिवा कुठे ठेवावा हे पाहूयात.
How to light diya correctly at sunset
How to light diya correctly at sunsetSAAM TV
Published On

आपल्या हिंदू धर्मामध्ये दररोज संध्याकाळी दिवे लावण्याची परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, सूर्यास्ताच्या वेळी घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात आनंद राहतो. तुळशीजवळ किंवा घराच्या उंबरठ्यावर दिवा लावणं खूप शुभ मानण्यात येतो. बरेच लोक याला माता लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक देखील मानतात.

परंतु बऱ्याचदा लोक नकळतपणे काही चुका करतात, ज्याचे शुभ परिणाम मिळण्याऐवजी वाईट परिणामही होऊ शकतात. म्हणून दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि नियम जाणून घेणं फार महत्वाचं आहे.

How to light diya correctly at sunset
Shukra Gochar 2026: १०० वर्षांनी शुक्राच्या गोचरमुळे तयार होणार समसप्तक राजयोग; पैसे मिळवून 'या' राशी जगणार ऐशोआरामात आयुष्य

संध्याकाळी दिवा का लावला पाहिजे?

धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतरच्या काळाला प्रदोष काळ म्हणतात. हा काळ पूजा आणि देवाच्या स्मरणासाठी शुभ मानला जातो. यावेळी घरात दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जे राहते. संध्याकाळी नियमितपणे दिवा लावल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात.

स्वच्छतेची काळजी घ्या

दिवा लावण्यापूर्वी ज्या ठिकाणी तुम्ही दिवा ठेवणार आहात त्या जागेची स्वच्छता करणं गरजेचं आहे. अस्वच्छ ठिकाणी दिवा लावणं अशुभ मानण्यात येतं. असंही मानलं जातं की, जर स्वच्छता न करता दिवा पेटवला गेला तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते. त्यामुळे दररोज संध्याकाळी दिवा लावण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करा. जर तुम्ही मंदिरात दिवा लावत असाल तर त्याठिकाणीही स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

How to light diya correctly at sunset
Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

योग्य वेळ निवडा

दिवा लावण्याची योग्य वेळ सूर्यास्तानंतर मानली जाते. प्रदोष काळात दिवा लावल्याने विशेष फायदे मिळतो. काही विशेष उपवास किंवा उत्सव वगळता रात्री उशिरा दिवा लावणं योग्य मानलं जात नाही. म्हणून सूर्य मावळताच किंवा त्यानंतर थोड्याच वेळात दिवा लावला पाहिजे.

अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, दिवा हा तूपाचा की तेलाचा असावा? धार्मिक मान्यतेनुसार, घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. तुपाचा दिवा देवांना प्रिय मानला जातो आणि घरात शांततेचं वातावरण निर्माण करतो. त्याचबरोबर घराच्या दरवाजाच्या चौकटीजवळ, मुख्य दरवाजाजवळ किंवा तुळशीजवळ मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

How to light diya correctly at sunset
Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु बृहस्पति बनणार ‘हंस महापुरुष राजयोग’, 3 राशींना मिळणार मनासारख्या गोष्टी

कोणत्या दिशेला दिवा लावावा?

वास्तुशास्त्रानुसार, दिवा ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला लावला पाहिजे. अशावेळी प्रत्येक पूजा आणि ठिकाणानुसार दिशा भिन्न असू शकते. म्हणून जर तुम्ही मंदिरात दिवा लावत असाल तर त्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा.

How to light diya correctly at sunset
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 300 वर्षांनी बनले 4 राजयोग आणि 12 शुभ योग, 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com