Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 300 वर्षांनी बनले 4 राजयोग आणि 12 शुभ योग, 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Mahashivratri 2026 Rare Rajyog: फाल्गुन कृष्ण पक्षातील महाशिवरात्री यंदा १५ फेब्रुवारीला साजरी होणार आहे. या वेळी दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होणार असून ३०० वर्षांनंतर प्रथमच एकाच वेळी ४ राजयोग आणि १२ शुभ योग तयार होणार आहेत.
Mahashivratri 2026 Rare Rajyog
Mahashivratri 2026 Rare Rajyogsaam tv
Published On

या वर्षी महाशिवरात्री १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महाशिवरात्री २०२६ ही खूप खास असणार आहे. ग्रह आणि ताऱ्यांच्या दुर्मिळ स्थितीमुळे ३०० वर्षांनंतर या दिवशी एक अतिशय खास योगायोग घडणार आहे.

आजच्या दिवशी १२ शुभ योग आणि ४ राजयोग एकत्र असणार आहे. या योगायोगांचा शुभ प्रभाव ३ राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या प्रभावामुळे या राशींचं भाग्य उजळणार आहे. या दिवशी कोणते शुभ योग तयार होत आहेत आणि कोणत्या राशींना त्यांचा फायदा होईल हे जाणून घेऊया.

महाशिवरात्रीला ४ राजयोग-

Mahashivratri 2026 Rare Rajyog
Surya Gochar: ६ फेब्रुवारीपासून पालटणार या राशींचं नशीब; 10 वर्षानी सूर्य करणार मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश

या ३ राशींना होणार फायदा

मेष रास

करिअरच्या बाबतीत मेष राशीसाठी हे योग चांगला फायदा देणार आहे. हे आर्थिक लाभ दर्शवतात. तुम्हाला कामावर पदोन्नती मिळू शकणार आहे. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला फायदेशीर संधी मिळणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना आदर आणि सन्मान वाढणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होणार आहेत. संपत्ती आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. सरकारी कामात यश मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

Mahashivratri 2026 Rare Rajyog
Horoscope: मंगळाचा ५० वर्षांनंतर शनीच्या राशीत प्रवेश, 'या' तीन राशींच्या लोकांच्या नशिबात होईल मोठा बदल

मकर रास

महाशिवरात्री मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. तुम्हाला भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळणार आहेत. संपत्ती जमा करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे.

Mahashivratri 2026 Rare Rajyog
Surya Gochar: ६ फेब्रुवारीपासून पालटणार या राशींचं नशीब; 10 वर्षानी सूर्य करणार मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com