Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

Hormonal Acne Before Periods : महिलांना दरमहिन्याला मासिक पाळीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या दिवसांमध्ये महिलांना पिंपल्सच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं.
Period Acne Causes
Period Acne Causesgoogle
Published On

दर महिन्याला महिलांना मासिक पाळी येते. वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून नियमित मासिक पाळी येत असते. या दिवसांमध्ये महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसतात. महिलांमध्ये मासिक पाळीच्या एक-दोन आठवडे आधी चेहऱ्यावर, त्यात विशेष म्हणजे हनुवटी आणि जबड्याच्या भागात पुरळ येते आणि त्याच्या खूप वेदना होतात. ही सामान्य ही सामान्य समस्या नाही.

बऱ्याच मुली याकडे साधी समस्या म्हणून पाहतात. पण तज्ज्ञांच्या मते, हे सतत येणारे मुरुम शरीरातल्या हार्मोनल बदलांचं संकेत किंवा लक्षणं आहेत. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करणं आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

मासिक पाळीच्याआधी पुरळ का येते?

तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरातले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळ्यांमध्ये सतत बदल होताना दिसतात. पाळी येण्याआधी इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी होतं, तर प्रोजेस्टेरॉन वाढतं. त्याने त्वचेतल्या तेलग्रंथी अॅक्टीव्ह होतात आणि जास्त तेल जमा होतं. हे तेल डेड स्कीनच्या पेशींमध्ये मिक्स झाल्याने त्वचेची छिद्र बंद होतात. त्यानंतर जिवाणूंची वाढ होऊन मग दुखणारे पिंपल्स येतात.

Period Acne Causes
Mahabaleshwar Tourism: पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचा प्लान करताय? महाबळेश्वरजवळच्या Top 7 ठिकाणी नक्कीच द्या भेट

हार्मोनल असंतुलन झाल्याने कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं?

तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला दरमहिन्याला मोठ-मोठे आणि दुखणारे पिंपल्स येत असतील तर तुम्ही ताण जास्त घेताय. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला पीसीओडी आणि इन्सुलिन इनबॅलेन्ससारख्या समस्या आहेत. यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपास केला पाहिजे.

जीवनशैलीत कोणते बदल करायचे?

तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या आहारात बदल केले पाहिजेत. तर मासिक पाळीच्या काही दिवस आधी तेलकट, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. हिरव्या भाज्या, फळं आणि सुकामेवा याचा आहारात समावेश केला पाहिजे.

Period Acne Causes
Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com