Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Aditi Tatkare On Ladki Bahin: ज्या लाडक्या बहिणींचा योजनेचा लाभ बंद झाला आहे. त्याचं कारण अदिती तटकरे यांनी सविस्तर सांगितलं आहे.
Ladki Bahin Scheme Ineligible Women
Ladki Bahin Scheme Ineligible Womengoogle
Published On

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिला घेत आहेत. सुरुवातीला या योजनेचा लाभ ८० लाखांपेक्षा जास्त महिलांनी घेतला. पुढे ईकेवायसी प्रोसेसनंतर काही महिलांचा हप्ता वगळ्यात आला. यामध्ये कोणत्या महिलांना हप्ता येणार नाही?, कोणत्या महिला अपात्र ठरल्या आणि कोणत्या महिलांना अपात्र केलं याची सगळी कारणं आदिती तटकरेंनी माध्यमांना सांगितली.

लाडक्या बहिणींचा दरमहिन्याचा हप्ता अचानक बंद झाला आणि महिला नाराज झाल्या. त्यावर स्पष्टीकरण देत आदिती तटकरे म्हणाल्या की, आत्तापर्यंत जवळपास ८० लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये काही पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.

Ladki Bahin Scheme Ineligible Women
Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

त्यामुळे सरकारने जवळपास १० महिन्यापासून ई केवायसी करण्याचे आदेश दिले. तर ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. त्यासोबत ज्या महिलांच्या कुटुंबातले आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्या महिलांच्या नावावर गाडी आहे अशांना अपात्र केलं आहे. असं उत्तर आदिती तटकरे यांनी दिलं.

ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चानंतरच्या निवेदनात ई- केवायसीसाठी मुदतवाढ, नवीन पात्र महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित अर्जांना संधी देणे तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांच्या अर्जांची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने शासनाला इशारा देण्यात आला की, १५ दिवसांत प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा पुढील मोर्चा संबंधित मंत्र्यांच्या निवासस्थानी काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Ladki Bahin Scheme Ineligible Women
365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com