Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

June Bank Holidays 2026 List : जून २०२६ मध्ये रविवार, दुसरा - चौथा शनिवार आणि काही महत्वाच्या दिवशी बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे महत्वाचे व्यवहार करण्याआधी तुम्ही ही माहिती नक्कीच जाणून घ्या.
June 2026 Bank Holidays
June 2026 Bank HolidaysGOOGLE
Published On

सध्या बॅंकशी संबंधित कामं घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने केली जातात. एका क्लिकवर तुम्ही कोणतेही व्यवहार करू शकता. मात्र काही अडथळे आले की बॅंकेच जावं लागतं. पण ऐनवेळी बॅंका बंद असतात. आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. आपण या महिन्यात एकूण किती दिवस बॅंक हॉलिडे (June Bank Holidays ) असतील याबद्दल पुढील माहिती जाणून घेणार आहोत.

कोणकोणत्या तारखेला रविवारची सुट्टी असेल?

७ जून २०२६ रोजी रविवारी बॅंका बंद ठेवण्यात येतील.

१४ जून २०२६ रोजी पूर्ण देशात बॅंका बंद राहतील.

२१ जून २०२६ रोजी रविवारी बॅंका बंद असतील.

२८ जून रोजी पूर्ण देशात बॅंका बंद राहतील.

June 2026 Bank Holidays
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

कोणकोणत्या शनिवारी बॅंका बंद राहतील?

१३ जून २०२६ रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्या कारणामुळे बॅंका बंद राहतील.

२७ जून २०२६ रोजी चौथा शनिवार असल्या कारणामुळे बॅंका बंद राहतील.

इतर कोणत्या दिवशी बॅंका बंद राहतील?

१५ जून २०२६ रोजी वाईएमए दिवस (YMA Day) आणि राज संक्रात आहे. या दिवशी बॅंका बंद राहतील. यासाठी ऐझॉल आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद राहतील. तर २५ जून २०२६ मोहरम या दिवशी बॅंका बंद असणार आहेत. तर २६ जूनला अगरतळा, ऐझॉल, बेलापूर, बंगळूरु, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची आणि श्रीनगर या ठिकाणच्या बॅंकाना सुट्ट्या असतील.

पुढे संत गुरु कवीर यांच्या जयंतीनिमित्त २९ जून २०२६ रोजी बॅंकांना सुट्टी असेल. रमणा दिनानिमित्त ३० जून २०२६ रोजी बॅंका बंद राहतील.

June 2026 Bank Holidays
Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com