Sakshi Sunil Jadhav
हार्ट अटॅकनंतर पूर्ण विश्रांती घेणे योग्य नाही, शरीराची रिकव्हरी झाल्यानंतर हळूहळू शारीरिक हालचाली सुरू करणे आवश्यक आहे.
डॉक्टरांच्या मते, हृदयाच्या स्नायूंनाही नियमित व्यायामाची गरज असते, त्यामुळे योग्य व्यायामामुळे हृदय जास्त मजबूत होऊ शकते.
हार्ट अटॅकनंतर व्यायाम कधी सुरू करायचा, हे संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवा.
बऱ्याचदा पहिल्या ते सहाव्या आठवड्यात कमी तीव्रतेच्या हालचाली करण्याचा सल्ला दिला जातो.
सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं चालणं सुरू करा आणि हळूहळू वेळ वाढवत राहा.
आठवड्यातील किमान 5 दिवस 30 मिनिटं चालण्यावर लक्ष्य ठेवा. हे फायदेशीर ठरू शकतं.
वॉकिंगसोबतच घरातील साफसफाई, बागकाम यांसारख्या दैनंदिन शारीरिक कामांचा हळूहळू समावेश करा.
हार्ट अटॅकनंतर योगा, पिलाटेस आणि स्ट्रेचिंग हे सुरक्षित आणि फायदेशीर व्यायाम मानले जातात. पण त्यांचा कालावधी टप्प्याटप्प्याने वाढवा.
ब्रीदिंग एक्सरसाइजतणाव कमी करण्यास मदत करतात. खोल श्वास घ्या, काही सेकंद श्वास थांबवून ठेवा. मग हळूहळू सोडा यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारेल.