Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

Eknath Shinde: लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ई-केवायसी पडताळणीनंतर ८० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana google
Published On

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत म्हणून महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता दिला जात होता. पण ई-केवायसीच्या पडताळणीनंतर ८० लाख महिला अपात्र ठरल्या आणि त्यांचा हप्ता बंद झाला आहे. या कारणामुळे महिला नाराज होत्या. त्यातच लाडकी बहीण योजना बंद होणार अशी विधानं विरोधक करत होते. त्यावर उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, स्त्री ही फक्त घराची शक्ती नसून संपूर्ण राष्ट्राला दिशा देणारी शक्ती आहे. अहिल्यादेवींनी महिलांना स्वावलंबन, नेतृत्व आणि कर्तृत्वाची प्रेरणा दिली. हाच विचार करून राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली आहे. तसेच कोणाच्याही विरोधामुळे ही योजना बंद होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात असं या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

Ladki Bahin Yojana
PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

ई- केवायसी पडताळणीनंतर २ कोटी ४६ लाख असणारी संख्या आता १ कोटी ६६ लाखांवर आलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज रद्द केले, त्यांना आता पुन्हा नोंदणी सुरु होणार का? अशा प्रश्न पडला आहे. मात्र यासंबंधीत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

ई- केवायसी अपडेट (ladki bahin yojana ekyc update)

महिलांना ३० एप्रिलपर्यंत महिलांना ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आधार कार्ड आणि बॅंक खातं लिंक केलं नाही, त्यांची नावं यादीतून वगळ्यात आली. योजनेचे नियम आणि उत्पनाच्या अटी पूर्ण न केल्यामुळे ८० लाख महिला अपात्र ठरल्या. त्यामुळे त्यांच्या खात्यात हप्ता येणं बंद झालं. दरम्यान काही पात्र महिलांनाही यादीतून वगळ्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com