

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. सध्या पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातोय. यामध्य वर्षातून तीन वेळा २-२ हजार रुपयांची मदत केली जाते. या महिन्यात २३ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार होता. मात्र मे महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे. अजुनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.
२३ वा हप्ता शेतकऱ्यांची खात्यात कधी जमा होणार? याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. तसेच सरकार या योजनेच्या हप्त्याची घोषणा कधी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. चला पुढील माहितीत आपण २३ वा हप्ता कधी मिळणार, तारीख कधी समोर येणार हे समजून घेऊयात.
आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हप्ते आले आहेत. तर १३ मार्च २०२६ रोजी २२ सावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या हस्ते देण्यात आला. या हप्त्याचा लाभ ९ कोटींहून जास्त पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे.
२२ वा हप्ता दिल्यानंतर आता २३ वा हप्ता कधी येणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यासाठी तुम्ही मागील हप्त्यांचा अंदाज घेऊ शकता. कारण हे हप्ते चार-चार महिन्यांच्या अंतराने पाठवले जातात. त्यानुसार २३ वा हप्ता हा चार महिन्यांनंतर म्हणजेच जूनमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र मे महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी पुढच्या हप्त्याच्या तारखा सांगितल्या नाहीत.
नेहमीप्रमाणे, सरकार पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर हप्ताची माहिती पाहू शकता. सरकार जून महिन्यात हप्ता देण्याची तारीख जाहीर करू शकतं, असा अंदाज आहे. मग २३ वा हप्ता जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला खात्यात पाठवला जाईल अशी शक्यता आहे. पण, अधिकृत माहिती अजुनही अपेक्षित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.