Sakshi Sunil Jadhav
सध्या आधार कार्ड हा तुमचा महत्वाचा पुरावा बनला आहे. ओळखीसोबत बॅंक खातं, सिम कार्ज, सरकारी योजना आणि बऱ्याच महत्वाच्या कामांसाठी आधार गरजेचं आहे.
आधार कार्डचा वापर बँकिंग, सरकारी योजना, पॅन लिंकिंग आणि सिम कार्डासाठी करतात. प्रत्येक महत्वाच्या पुराव्याला आधार कार्ड जोडलेलं असतं.
तुम्ही जर मोबाईल नंबर किंवा तुमचा पत्ता बदलला असेल, तर आधाराकार्डात नवीन माहिती अपडेट करणं आवश्यक असतं.
UIDAI च्या नियमानुसार, तुम्ही आधार कार्डवरील पत्ता हा तुमच्या गरजेनुसार भरपूरवेळा अपडेट करता येतो.
myAadhaar पोर्टलच्या मदतीने घरबसल्या ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मोबाईल नंबरही तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदलू शकता. यासाठी आधार सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता.
UIDAI Aadhaar App च्या मदतीनेही तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
तुम्हाला आधारकार्डात फक्त दोनदा नाव अपडेट करता येतं. तर जन्मतारीख आणि जेंडरमध्ये फक्त एकदाच बदल करता येतो.
नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख किंवा जेंडर अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त 75 रुपये शुल्क भरावे लागतात.