8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, फक्त DA आणि फिटमेंट फॅक्टर नाही, तर फॅमिली फॉर्म्यूलाही वाढवू शकतो तुमचा पगार

Salary Hike : आठव्या वेतना आयोगात फॅमिली युनिट फॉर्म्यु्ल्यावर मोठी चर्चा सुरु आहे. कर्मचारी संघटनांनी ३ ऐवजी ५ युनिट्स मान्य करण्याची मागणी केली आहे.
8th Pay Commission salary hike
8th Pay Commission salary hikegoogle
Published On

सध्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहेत. ही चर्चा सुरु असताना त्यातले महत्वाचे दोन मुद्दे असतात. ते म्हणजे डियरनेस अलाउंस (DA) आणि फिटमेंट फॅक्टर. याच्याच आधावर सॅलेरीत वाढ होते असं अनेकांना माहितीच आहे. पण यामध्ये आणखी एका फॉर्म्यूल्याचा समावेश आहे. तो फॉर्म्यूला कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

काय आहे फॅमिली युनिट फॉर्म्युला?

केंद्रीय कर्मचाऱ्यांची सॅलरी वाढण्यासाठी फॅमिली युनिट फॉर्म्यूला महत्वाचा ठरतो. त्यामध्ये कर्मचाऱ्याला त्याचा फॅमिलीनुसार किती खर्च लागू शकतो. हे ठरवलं जातं. सध्या आठव्या वेतन आयोगात झालेल्या बैठकीत कर्मचारी संघटना हाच फॉर्म्यूला बदलण्याची मागणी करत आहे.

8th Pay Commission salary hike
RBI Plastic Notes: ना फाटणार, ना भिजणार! आता बाजारात येणार प्लॅस्टिकच्या नोटा? काय आहे RBIचा प्लॅन?

कारण त्यांच्या मते, सध्याच्या जमान्यात हा फॉर्म्यूला खूप जुना झालाय. वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि औषधोपचारांचं ओझं पाहता नव्या फॉर्म्युल्याची गरज आहे. सध्या एका कुटुंबाला फक्त ३ युनिट्स मानले जातात. म्हणजे नवरा- बायको आणि मुलांपैकी एका मुलाचा खर्च विचारात घेतला जातो.

कर्मचारी संघटनांची मागणी काय आहे?

राष्ट्रीय कर्मचारी परिषद (NC-JCM) आणि इतर कर्मचारी संघटनांनी सॅलरी कॅलक्युलेशनसाठी कुटुंबाचे ५ युनिट्स मान्य कराव्यात अशी मागणी मागणी आहे.

प्रस्तावित फॉर्म्युलानुसार:

कर्मचारी – 1 युनिट

नवरा/बायको – 1 युनिट

दोन मुले – प्रत्येकी 0.8 युनिट (एकूण 1.6 युनिट)

आई-वडील – 0.8 युनिट अशा प्रकारे 5.2 युनिट्स होतात. त्याला राऊंड फिगरमध्ये ५ युनिट्स मानण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

पगारावर किती होऊ शकतो परिणाम?

जर ही मागणी स्विकारली तर पगारात मोठी वाढ होऊ शकते. कर्मचारी संघटनेट्या मते, ५ युनिट्सच्या फॅमिलीसाठी बेसिक सॅलरी ६९,००० रुपये होईल. तर फिटमेंट फॅक्टर सुमारे ३.८३३ पर्यंत जाऊ शकतो. याचा परिणाम फक्त तुमच्या सॅलेरी नाही तर अनेक भत्ते, पेन्शनआणि संपूर्ण सॅलेरी पॅकेजवर होतो.

8th Pay Commission salary hike
Chanakya Niti : तुमच्यालाही लोक ४ माणसात मुर्ख ठरवतायेत? चाणक्यांच्या सल्ल्यानुसार आत्ताच बदला या सवयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com