

भारतात लवकरच कागदी नोटांऐवजी प्लास्टिकच्या नोटा चलनात येण्याची शक्यताय. RBI यावर वेगानं काम करत असून, नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकांमध्ये या प्रस्तावावर चर्चा झालीय. कागदी नोटांच्या छपाईचा वाढता खर्च आणि मोठ्या प्रमाणावर खराब होणाऱ्या नोटांमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. प्लास्टिकच्या नोटांची निर्मिती स्वस्त असेल, त्यांचं आयुष्य जास्त असेल आणि त्या एटीएम मशीनसाठीही सुसंगत असतील. यासाठी आरबीआय लवकरच एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची योजना आखतायत.
भारतात सध्या प्लास्टिकच्या नोटा सुरु होणार अशा चर्चा सुरु आहेत. अनेक माध्यमांवर या प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात येतील अशी शक्यता दिसत आहे. त्यातच बिझनेस स्टॅंडर्सच्या प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, भारतात पॉलिमर नोटांचा वापर करण्यात येईल असा विचार भारतीय रिझर्व्ह बॅंक (RBI) करत असल्याचं सांगितलं आहे. कारण भारतात पॉलिमर नोटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय.
आत्तापर्यंत तुम्ही कागदी नोटांचा वापर केला असेल. पण त्या सतत फाटतात किंवा लगेचच खराब होतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा आणि मुंबईमध्ये झालेल्या आरबीआयटच्या गेल्या दोन बोर्डाच्या बैठकांमध्ये पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या निर्णयावर चर्चा झाली. त्यामध्ये असं सांगितलं की, पॉलिमर नोटा या कागदी नोटांपेक्षा कमी खर्चात तयार होतील. तसेच त्या लवकर खराब होणार नाहीत किंवा फाटणार नाहीत. जास्त काळ टिकतील. त्यामुळे या नोटा चलनात आणण्याचा विचार केला जातोय.
नव्या नोटा या ATM शी सुसंगत असतील. म्हणजे एटीएम मशीन ही पॉलिमर बेस्ट नोटा लागू करण्यासाठी सक्षम आहे. आरबीआय बॅंकेकडे या नोटा छापण्यासाठी लागणारी संसाधने आहेत. केंद्रीय बॅंक पॉलिमर नोटांसाठी एक पायलट प्रोजेक्टची योजना बनणार आहे. याची घोषणा भविष्यात केली जाऊ शकते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.