Gold Price Today: घसरणीला ब्रेक! सोने-चांदी पुन्हा महागलं! जाणून घ्या, १ तोळा सोन्याचा आजचा भाव किती?

Gold Rate Maharashtra: सोनं-चांदीच्या किंमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यात आजच्या किंमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
gold price today India
gold price today Indiagoogle
Published On

Todays Gold Rate Mumbai Pune Jalgaon : दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात होत असणाऱ्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. GoodReturns नुसार, २४ कॅरेट सोन्याचे दरात प्रति तोळा १५८० रूपयांची वाढ झाली आहे. पुढील काही दिवस सोन्याच्या दरात चढ उतार कायम राहील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. अमेरिका आणि इराण युद्धामुळे जगभरात महागाईचा आलोख वाढताना दिसत आहे. त्यात कच्च्या तेलाच्या किंमतीही मोठी वाढ होतेय. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे.

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. GoodReturns च्या माहितीनुसार, सोने-चांदीच्या किमतीत आज वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १५८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज २४ कॅरेट सोनं प्रति तोळा 1,57,640 रूपयांवर पोहचलेय. मुंबई, पुण्यापासून सर्वच शहरात सोन्याच्या दरात आज बदल झालाय. कोणत्या शहरात सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात..

gold price today India
SSC Supplementary Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

आजचा सोन्याचा दर काय? Todays Gold Rate

आज भारतामध्ये २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १५,७६४ रुपये आहे. यात १५८ रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १४,४५० रुपये असून यामध्ये १४५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ११, ८२३ रुपये असून यामध्ये ११९ रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर हा प्रति ग्रॅम १५,७६४ रुपये आहेत.

८ ग्रॅम सोन्याचा दर हा १,२६,११२ आहे.

१ तोळ्याचा म्हणजेच १० ग्रॅमचा भाव हा १,५७,६४० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर हा प्रति ग्रॅम १४,४५० रुपये आहेत.

८ ग्रॅम सोन्याचा दर हा १,१५,६०० आहे.

१ तोळ्याचा म्हणजेच १० ग्रॅमचा भाव हा १,४४,५०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

मुंबईमध्ये १८ कॅरेट सोन्याचा दर हा प्रति ग्रॅम ११,८२३ रुपये आहेत.

८ ग्रॅम सोन्याचा दर हा ९४,५८४ आहे.

१ तोळ्याचा म्हणजेच १० ग्रॅमचा भाव हा १,१८,२३० रुपये आहे.

gold price today India
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पेन्शन नियमांच्या मोठ्या बदलाचे संकेत, आठव्या वेतन आयोगानंतर होणार फायदाच फायदा

पुण्यातील आजचा दर

२४ कॅरेट - १५, ७६४

२२ कॅरेट - १४, ४५०

१८ कॅरेट- ११, ८२३

नागरपूरमधील आजचा दर

२४ कॅरेट - १५,७६४

२२ कॅरेट - १४, ४५०

१८ कॅरेट- ११, ८२३

दिल्लीमधील आजचा दर

२४ कॅरेट - १५,७७९

२२ कॅरेट - १४, ४६५

१८ कॅरेट- ११, ८३८

अमरावतीमधील आजचा दर

२४ कॅरेट - १५,७६४

२२ कॅरेट - १४, ४५०

१८ कॅरेट- ११, ८२३

चेन्नईमधील आजचा दर

२४ कॅरेट - १५,९२८

२२ कॅरेट - १४,६००

१८ कॅरेट- १२, २५५

ठाण्यातील आजचा दर

२४ कॅरेट - १५,७६४

२२ कॅरेट - १४,४५०

१८ कॅरेट- ११, ८२३

कोल्हापूरमधील आजचा दर

२४ कॅरेट - १५,७६४

२२ कॅरेट - १४,४५०

१८ कॅरेट- ११, ८२३

चांदीचा आजचा भाव

चांदीच्या भावातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. १ ग्रॅम चांदीची किंमत २८० रुपये आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत २,२४० रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ही २,८०० रुपये आहे. तर १००० ग्रॅम चांदीची किंमत ही २,८०,००० रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com