Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकाला हुशार बनायचं असतं. पण काही सवयींमुळे त्याला मुर्ख ठरवलं जातं.
गुरु चाणक्यांच्या मते, मुर्खपणा हा माणसाच्या शिक्षणावर नाही तर माणसाच्या विचारसरणीवर अवलंबून असते. त्यामुळे वेळेवर स्वत:च्या चुका ओळखणं खूप गरजेचं आहे.
काही लोकांना प्रत्येक विषयावर बोलायची सवय असतं. ते आधी बोलतात आणि नंतर विचार करतात. चुकीचे शब्द समोरच्या व्यक्तीला दुखवतात.
आपल्या आसपास अशी बरीच लोकं असतात, जी इतरांना सतत शिकवत असतात. चाणक्यांच्या मते, जो माणूस शिकणं थांबवतो, त्याची प्रगतीही थांबते.
राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. पण रागात घेतलेले निर्णय पुढे मोठं नुकसान करू शकतात. त्यामुळे शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची सवय लावा.
अहंकारी लोक स्वतःची चूक मान्य करत नाहीत. अशा लोकांना माफी मागणं कमीपणाचं वाटतं. पण याच सवयीमुळे ते हळूहळू लोकांपासून दूर जातात. चाणक्यांच्या मते, अहंकार माणसाला आतून कमकुवत बनवतो.
चुका प्रत्येकाकडून होतात. पण त्यातून शिकणं महत्त्वाचं असतं. जो व्यक्ती वारंवार तीच चूक करतो आणि त्यातून काहीच शिकत नाही, तो आयुष्यात मागे पडतो.
काही लोकांना स्वतःचं मतच नेहमी योग्य वाटतं. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत वाद घालतात. पण अशा स्वभावामुळे लोक त्यांच्यापासून लांब राहतात.
समजूतदार माणूस इतरांचं मत शांतपणे ऐकतो. पण मूर्ख व्यक्तीला वाटतं की त्यालाच सर्व काही माहिती आहे. ही सवय व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकते.