Sakshi Sunil Jadhav
वेलचीमधले नैसर्गिक तेल लाळ आणि पाचक एन्झाइम्सचं उत्पादन वाढवण्याचं काम करतात. जेवण पचायला मदत होते.
वेलचीमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात. हे गुणधर्म पोटात गॅस तयार होण्यापासून थांबवतात आणि पोटफुगीची समस्या कमी होते.
तुम्ही रोज वेलची खाल्लीत तर पित्त आणि जठररसांचं स्रवण सुधारतं. त्यामुळे अपचन, अन्न न पचणे आणि पोटातील अस्वस्थता कमी होऊ शकते.
वेलचीमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात. हे तोंडातली दुर्गंधी दूर करतात. त्याने तोंडाचा वास जास्त येत नाही.
तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांचा अॅसिडिटीचा त्रास वाढतो. वेलची पोटातले आम्ल कमी करते आणि जळजळ कमी करते.
वेलचीने शरीरातली चयापचय क्रिया सक्रिय होते. त्यामुळे शरीर ऊर्जा जास्त प्रभावीपणे वापरते आणि वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरतं.
ज्यांना जेवल्यावर सुस्ती किंवा थकवा येतो त्यांनी वेलची खाल्ली पाहिजे. कारण त्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला फ्रेश वाटतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.