Period Health: २१ दिवसांनंतर मासिक पाळी येणं नॉर्मल आहे का? डॉक्टरांनी सांगितलं किती छोटी असून शकते पिरीयड्स सायकल

What does a 21 day menstrual cycle mean: दर 21 दिवसांनी पिरीयड्स येणं नॉर्मल आहे का, हा अनेक महिलांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. हार्मोनल बदल, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि जीवनशैलीमुळे सायकल बदलू शकते.
What does a 21 day menstrual cycle mean
Irregular Periods Saam Tv
Published On

महिलांमध्ये मासिक पाळीची सायकल साधारणपणे 28 ते 30 दिवसांची असते. प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असल्यामुळे काही वेळा ही सायकल 21 ते 35 दिवसांदरम्यानही असू शकतो. मात्र काही महिलांना दर 21 दिवसांनीही पीरियड्स येतात. अशा वेळी या कालावधीची सायकल योग्य आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो.

याच संदर्भात फरीदाबाद क्लाउडनाइन हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूजा ठुकराल यांनी ओनली माय हेल्थ वेबसाईटला माहिती दिली. त्यांनी या २१ दिवसांनी पिरीयड्स येणं योग्य आहे का याबाबत माहिती दिलीये.

पीरियड्स नेहमी 28 दिवसांनीच यायला हवेत का?

डॉ. पूजा सांगितलं की, पीरियड्सची सायकल हा पहिल्या दिवसापासून पुढील पीरियडच्या पहिल्या दिवसापर्यंत मोजला जातो. हा कालावधी बहुतेक वेळा 25 ते 30 दिवसांचा असतो. काही महिलांमध्ये हा कालावधी थोडा कमी किंवा जास्तही असू शकतो. त्यामुळे 28 दिवसांची सायकल हा एक सरासरी आहे. पण प्रत्येक स्त्रीसाठी तोच लागू होईल असं नाही. महत्त्वाचे म्हणजे पीरियड्स नियमित असावेत आणि रक्तस्राव सामान्य प्रमाणात असावा.

21 दिवसांनी पीरियड्स येणं समस्या आहे का?

डॉ. पूजा यांच्या मते, जर पीरियड्सचं येण्याचं अंतर 21 दिवसांपेक्षा कमी किंवा 35 दिवसांपेक्षा जास्त असेल, तर ती नियमित सायकल मानली जात नाही. अशा परिस्थितीला ‘अनियमित पीरियड्स’ असं म्हटलं जातं. हे प्रामुख्याने शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडल्यामुळे होते. जर पीरियड्सदरम्यान खूप वेदना, मळमळ, उलट्या किंवा खूप जास्त रक्तस्राव होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

What does a 21 day menstrual cycle mean
Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

यामागे हार्मोनल बदल, ताणतणाव, झोपेची कमतरता, वजनातील बदल किंवा प्रवास यांसारखी कारणंही असू शकतात. जर ही समस्या वारंवार होत असेल, तर तपासणी करणं गरजेचं आहे.

21 दिवसांच्या सायकलचे परिणाम

डॉ. पूजा यांनी स्पष्ट केलंय की, 21 दिवसांची सायकल असली तरी प्रेग्नेंसी होण्याची शक्यता कमी होत नाही. जर ओव्ह्युलेशन योग्य वेळी होत असेल तर गर्भधारणा शक्य आहे. मात्र सायकल 21 दिवसांपेक्षा कमी असेल तर ओव्ह्युलेशनवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी डॉक्टर काही तपासण्या करून योग्य मार्गदर्शन करतात.

What does a 21 day menstrual cycle mean
Heart blockage symptoms: हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी ही लक्षणं ओळखा; हार्ट अटॅक टाळण्यासाठी वेळेत घ्या काळजी

अशक्तपणा येण्याचा धोका असतो का?

या संदर्भात डॉ. पूजा सांगतात की, प्रत्येक स्त्रीची शारीरिक रचना वेगळी असते. जर एखाद्या महिलेला नियमितपणे 21 दिवसांनी पीरियड्स येत असतील आणि इतर कोणतीही तक्रार नसेल, तर ते पूर्णपणे सामान्य मानले जाऊ शकते. अशक्तपणा ही सहसा जास्त रक्तस्राव, अ‍ॅनिमिया किंवा पोषणाच्या कमतरतेमुळे येते. याचा सायकलच्या कालावधीशी थेट संबंध नसतो. मात्र जर खूप जास्त ब्लीडिंग होत असेल किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

What does a 21 day menstrual cycle mean
Gas after drinking milk: दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस किंवा दुखणं होतं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com