

शरीरात कोणताही बिघाड असाल की आपलं शरीर आपल्याला संकेत देत असतं. जर हे संकेत वेळेत ओळखले तर गंभीर आजार देखील टाळता येऊ शकतात. जगभरात सर्वाधिक आढळणाऱ्या हृदयाच्या समस्यांपैकी एक म्हणजे कोरोनरी आर्टरी डिजीज. या आजारात हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या नीट काम करत नाहीत.
हृदयाच्या नसा या अचानक ब्लॉक होत नाहीत. ही प्रक्रिया हळूहळू वाढत जाते, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामध्ये रक्तवाहिन्यांच्या आत फॅट साचायला सुरुवात होतं. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये फॅट साचायला सुरुवात होत तेव्हा फारशी लक्षणं दिसून येत नाहीत.
काही दिवसांनंतर हा त्रास जाणवू लागतो. याचं पहिलं लक्षण छातीत दडपण किंवा वेदना अशा स्वरूपात दिसतात. रोजची कामं करतानाही श्वास लागणं किंवा पाय सुजणं हेही हृदयाशी संबंधित त्रासाची लक्षणं असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, ब्लॉकेजचं मुख्य कारण म्हणजे ‘प्लाक’. हा कोलेस्ट्रॉल, फॅट, कॅल्शियम आणि इतर घटकांचा एकत्रित थर असतो. जो रक्तवाहिन्यांच्या वॉलवर जमा होतो. यामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि शरीराच्या विविध अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मुळात यामागे अनेक कारणं असतात.
खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढणं, चांगल्या कोलेस्ट्रॉलचं (HDL) प्रमाण कमी होणं, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि मधुमेह हे सगळे घटक रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात आणि प्लाक तयार होण्याची प्रक्रिया वेगाने घडते.
प्लाक वाढत गेला की रक्तपुरवठा आणखी कमी होतो आणि हृदयावर जास्त ताण येतो. काही वेळा हा प्लाक फुटल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
सुरुवातीच्या टप्प्यात छातीत जडपणा किंवा वेदना जाणवणं, थोडं चाललं तरी श्वास लागणं, कारण नसताना थकवा येणं ही लक्षणं दिसू शकतात. काही वेळा वेदना खांद्यापर्यंत, हातापर्यंत किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते. चक्कर येणं किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणंही संकेत असू शकतात.
ब्लॉकेज शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जाणवतं. हृदयाशी संबंधित असल्यास छातीत वेदना आणि घाम येणं, मेंदूवर परिणाम झाल्यास बधिरपणा किंवा बोलताना अडचण, पायांमध्ये असल्यास चालताना वेदना आणि मानेत कमजोरी अशी लक्षणं दिसू शकतात.
या समस्येमध्ये काही गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. उच्च रक्तदाब, जास्त कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, चुकीची जीवनशैली, वाढतं वय आणि कुटुंबातील इतिहास यामुळे धोका वाढतो. पण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी तपासणी केल्यास हा धोका कमी करता येतो.
योग्य त्या तपासण्या करून अचूक स्थिती समजून घेता येते. यामध्ये ब्लड टेस्ट, ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, इकोकार्डियोग्राम, अँजिओग्राफी आणि सीटी स्कॅन यांचा समावेश असतो. या चाचण्यांमुळे रक्तवाहिन्यांची स्थिती समजते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.