

उद्या गुढीपाडवा, मराठी नववर्षाची सुरुवात
गुढी किती वाजता उभारायची?
गुढी उभारण्याचा शूभ मूहूर्त काय?
उद्या १९ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. उद्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी कुटुंबात गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढी उभारुन नवीन वर्षात पदार्पण करतात. दरम्यान, आता उद्या गुढी किती वाजता उभारायची, गुढी उभारण्याचा मूहूर्त काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
गुढी उभारण्याचा शूभ मूहूर्त (Gudi Padawa Shubh Muhurt)
उद्या १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटानंतर गुढी उभी करा,असं दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांचं आवाहन आहे. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटानंतर गुढी उभी करण्याचा शुभ मुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गुडी उभी करायला विशेष मुहूर्त नसला तरी ६ वाजून ४५ मिनिटानंतर ते इष्ट ठरणार आहे. उद्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गुढी उभारावी.
गुढी का उभारतात? (Why Gudi Padwa Celebrated)
भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करुन प्रजेला त्याच्या छळातून मुक्त केले होते. याच दिवशी प्रभू श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवासदेखील संपला होता. त्यामुळे हा आनंदोत्सावाचा दिवस असते. रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत आल्यानंतर सर्वांना विजयोत्सव साजरा करण्यासाठी घराच्या दारावर गुढी उभारली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली.
पौराणिक कथेनुसार, शालिवाहन राजाने याच दिवशी मातीच्या सैनिकांना प्राण दिला होता. या सैनिकांच्या साहाय्याने शत्रूंचा पराभव केला होते. त्यामुळे या विजयाची पताका म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढी उभारली जाते, असं म्हटलं जाते.
टीप- वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.