Shreya Maskar
गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला आणि अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
यंदा गुढीपाडवा हा सण 19 मार्च 2026ला आला आहे. या दिवशी मराठमोळा लूक करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी अनेक शुभ गोष्टी घडतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, गुढीपाडव्याला सोने खरेदी करणे हे समृद्धी, संपत्ती आणि भरभराटीचे लक्षण मानले जाते. या दिवशी तुम्ही छोटीशी का होईना सोन्याची वस्तू किंवा दागिना खरेदी करा.
गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्याने, या दिवशी सोन्यात गुंतवणूक केल्याने वर्षभर लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आर्थिक सुरक्षितता लाभते, अशी मान्यता आहे.
सोने हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर होऊन सुख नांदते.
सोने खरेदी करताना दागिन्यांवर 'हॉलमार्क' (BIS Hallmark) आहे की नाही, हे आवर्जून तपासा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
सोन्याची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी सोनाराकडून GST असलेले पक्के बिल घेणे आवश्यक आहे. सोने खरेदी चांगल्या, ओळखीच्या दुकानातून करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.