Shreya Maskar
उन्हाळ्यात प्रखर सूर्यकिरणांपासूनत्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सनबर्न, टॅनिंग, सुरकुत्या, काळे डाग , पिंपल्स यांपासून त्वचेचे संरक्षण करते.
उन्हाळ्यात सनस्क्रीन लावण्याचा सल्ला सर्वजण देतात. तुम्ही चेहऱ्यावर आणि मानेवर सनस्क्रीन लावतात, परंतु त्याचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे त्वचा ते पूर्णपणे शोषून घेत नाही. ज्यामुळे चेहरा काळा पडतो.
तुमच्या स्किन टाइपनुसार सनस्क्रीन निवडा. जर तुम्ही चुकीची सनस्क्रीन निवडली असेल तर चेहरा काळा पडू शकता. त्यामुळे चांगल्या ब्रँडच्या सनस्क्रीनची निवड करा.
सनस्क्रीन लावण्यासाठी बोटांचा नियम लक्षात ठेवा. दोन बोटांच्या लांबी इतके सनस्क्रीन घ्या. नंतर ते तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, जेणेकरून ते पूर्णपणे त्वचा झाकून ठेवेल.
बहुतेक लोक दिवसातून फक्त एकदाच सनस्क्रीन लावतात. ही एक मोठी चूक आहे. एकदाच लावल्याने घाम, धूळ, पाणी आणि त्वचेवरील तेलामुळे कालांतराने सनस्क्रीन खराब होते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, चार ते पाच तासांनी सनस्क्रीन लावणे योग्य ठरते. ज्यामुळे त्वचा काळी पडत नाही आणि कायम हायड्रेट राहते.
बहुतेक लोक फक्त बाहेर असतानाच सनस्क्रीन लावतात, जे चुकीचे आहे. घरी असतानाही सनस्क्रीन लावा. कारण खिडकीतून सूर्य किरणे येतात. सूर्यप्रकाशात असलेले UVA किरण त्वचेला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे संरक्षणासाठी घरात असतानाही सनस्क्रीन लावावे.