Summer Fashion : उन्हाळ्यात कॉलेजमध्ये स्टायलिश अन् कूल लूक हवाय? मग 'हे' ५ ड्रेस एकदा ट्राय तर करा

Shreya Maskar

कॉलेज आउटफिट

उन्हाळ्यात शरीराला थंड आणि आरामदायक ठेवण्यासाठी सुती कपडे घाला. यामुळे हवा खेळती राहते तसेच फिकट रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्या. सुंदर कॉलेज आउटफिट्स एकदा पाहा.

Summer Fashion | pinterest

कुर्ती-जीन्स

उन्हाळ्यात कॉटन कुर्ती आणि जीन्स हे सर्वात कंफर्टेबल कॉम्बिनेशन आहे. त्यात काळ्या रंगापेक्षा ब्लू जीन्सची निवड करा. कॉटन कपडा घाम शोषतो आणि थंडावा देतो. कुर्तीमध्ये पेस्टल कलर वापरा.

Kurti & Jeans | pinterest

ओव्हरसाईज टी-शर्ट

आजकाल ओव्हरसाईज टी-शर्टची फॅशन पाहायला मिळते. ज्यामुळे तुम्ही मोठेही दिसता. तसेच या कपड्यांमध्ये हवा खेळती राहते, ज्यामुळे जास्त गरम होत नाही. तुम्ही यासोबत डेनिम शॉर्ट्स घालू शकता. तसेच उन्हाळ्यात प्रिंटेड टी-शर्ट सुंदर दिसतात.

Oversized T-shirts | pinterest

फ्लोरल ड्रेस

मुलींनो फ्लोरल ड्रेस तर उन्हाळ्यात घातलेच पाहिजे. फ्लोरल ड्रेस एक क्लासी लूक देतात. तसेच शरीराला थंडावा मिळतो. यात यलो, पिंक, लॅव्हेंडर कलर सुंदर दिसतात.

Floral Dresses | pinterest

क्रॉप टॉप

तुम्हाला स्वस्तात मस्त समर आउटफिट पाहिजे असतील तर क्रॉप टॉप हा बेस्ट पर्याय आहे. यामुळे एक स्टायलिश आणि मॉडर्न लूक येतो.

Crop Tops | pinterest

प्लाजो , कुर्ती

प्लाजो आणि कुर्ती हे सर्वात आरामदायी आउटफिट आहे. तसेच कॉटनचे सुंदर कुर्ती सेट खरेदी करा. हे कपडे तुमच्या शरीराला चिकटत नाही, ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात अस्वस्थ वाटत नाही.

Palazzo & Kurti | pinterest

वन पीस

उन्हाळ्यात वन पीस हा देखील फॅशनसाठी चांगला पर्याय आहे. कॉलेज आउटफिटसाठी अगदी परफेक्ट आहेत. यात तुम्ही छान प्रिंटचे वन पीस खरेदी करू शकता.

One-Piece Dresses | pinterest

कोड सेट

आजकाल सर्वत्र कोड सेटची फॅशन पाहायला मिळते. या कपड्यात तुम्ही खूप वेळ एका ठिकाणी बसू शकता. कॉलेजचे लेक्चर तुम्ही आरामात अटेंड करू शकता. तसेच तुमच्या फॅशनची कॉलेजमध्ये चर्चा होईल.

Co-ord Sets | pinterest

NEXT : गुढीपाडव्याला फक्त ५ मिनिटांत नेसा नऊवारी साडी; 'ही' घ्या सोपी ट्रिक, सर्वात सुंदर दिसेल तुमचा मराठमोळा लूक

Gudi Padwa 2026 | yandex
येथे क्लिक करा...