Shreya Maskar
यंदा गुढीपाडवा हा सण 19 मार्चला आला आहे. या दिवशी महिला सुंदर मराठमोळा लूक करतात. नऊवारी साडी, पारंपरिक दागिन्यांमध्ये त्यांचे सौंदर्य वाढते. पण सणाच्या घाईगडबडीत फक्त 5 मिनिटांत साडी कशी नेसावी, जाणून घेऊयात.
नऊवारी साडी नेसण्यासाठी साडीच्या मध्यभागाची घडी करून मागे कंबरेवर ठेवून साडीची दोन्ही टोके पुढे आणा आणि पोटावर एक घट्ट गाठ मारा.
दोन्ही पायांतून साडीचा पदर मागच्या बाजूला काढून पायांच्या मध्यभागी 'V' आकारात (काष्टा) बनवा. काष्टामध्ये साडीची डिझाइन खूप सुंदर दिसते.
उजव्या टोकाला निर्या काढून मागे कंबरेत खोचा. उरलेल्या कपड्याचा पदर बनवा आणि डाव्या खांद्यावर घ्या. पदराची उंची थोडी जास्त ठेवा.
उरलेला भाग सरळ करून डाव्या कमरेत खोचा. साडीची उंची योग्य राहण्यासाठी पायांतून काढताना साडी चापूनचोपून बांधा.
नऊवारी साडी नेसताना पेटीकोट घागरासारखा घालणे टाळा आणि लेगिंग्ज वापरा. जेणेकरून नऊवारी साडीचा आकार चांगला आणि परफेक्ट दिसेल.
साडीची खरी शोभा त्याच्या पदरात असते. त्यामुळे साडी नेसल्यावर पदराची डिझाइन परफेक्ट दिसते का ते तपासा. पदराच्या सुरवातीला लहान आणि नंतर मोठ्या प्लेट्स करा.
सुंदर नऊवारी साडीची शोभा वाढवण्यासाठी पारंपरिक लूक करा. यासाठी नथ, कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.