Shreya Maskar
महिलांनो उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळा म्हटले की घाम आणि दुर्गंधी आली. यामुळे अनेक वेळा महिलांना त्रास होते. उदास वाटते, तसेच कमी आत्मविश्वास भासतो. मात्र उन्हाळ्यातही महिला फ्रेश राहू शकतात. ब्युटी सीक्रेट वाचा.
तुम्ही स्वतःसाठी एक सिग्नेचर परफ्यूम निवडावा. ज्याचा सुगंधाने तुम्हाला फ्रेश आणि सकारात्मक वाटेल. जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा ते तुमचा सुगंध लक्षात ठेवतात. तो परफ्यूम तुम्ही वारंवार लावा.
लक्षात घ्या परफ्यूमचा वास जास्त strong नसावा. तो हलका सुगंधी असावा. तसेच जास्त काळ टिकणारा हवा. थोडा लावला तरी दिवसभर तो तुम्हाला फ्रेश ठेवेल.
उन्हाळ्यात खूप घाम येतो, त्यामुळे शरीराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तोंड उघडताच वाईट वास येत असेल तर तुमची छाप समोरच्या व्यक्तीवर खराब पडते. त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
दिवसातून दोनदा दात घासून घ्या. इलेक्ट्रिक टूथब्रश तुमचे दात नीट स्वच्छ करतील. तसेच टंग क्लीनर वापरा. माउथ फ्रेशनर उन्हाळ्यात तुमच्यासोबत ठेवा.
उन्हाळ्यात केसांना प्रचंड घाम येतो. ज्यामुळे महिलांना अस्वस्थ वाटते. तसेच दररोज केस धुणे शक्य नसते त्यामुळे सुगंधीत हेअर सीरमची निवड करा.
हेअर सीरममुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांना चमक येते. तुमचा आत्मविश्वास वाढतो. तसेच कोंड्याची समस्या दूर होते.
चांगला वास येण्यासाठी तुमचे कपडे ताजे आणि सुगंधित असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी फॅब्रिक कंडिशनर वापरा. जे कपडे मऊ करते आणि वास चांगला येतो.