Gudi Padwa 2026 : सणासुदीला घाईगडबडीत फक्त ५ मिनिटांत करा मेकअप, 'या' ३ स्टेप्समध्ये चेहरा दिसेल उजळ

Shreya Maskar

गुढीपाडवा

गुढीपाडवा हा सण यंदा 19 मार्चला आला आहे. गुढीपाडव्याला महिला वर्ग छान नऊवारी साडी नेसून, मराठमोळा साज श्रृंगार करून तयार होतो.

Gudi Padwa | yandex

नवीन वर्षाची सुरूवात

गुढीपाडवा हा हिंदूंचा प्रमुख सण असून, तो मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी दारासमोर रांगोळी काढतात आणि गुढी उभारतात आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवतात.

Gudi Padwa | yandex

महिलांचा साज श्रृंगार

गुढीपाडव्याला तुम्हाला सुंदर मराठमोळा लूक हवा असेल तर सुंदर लाल, हिरव्या रंगाची साडी नेसा. तसेच साडीला मॅचिंग पारंपरिक दागिने घाला. हातात हिरवा चुडा, कपाळावर चंद्रकोर आण केसात गजरा माळायला विसरू नका.

Gudi Padwa | yandex

मेकअप

साज श्रृंगार म्हटले की सुंदर मेकअप आलाच. गुढीपाडव्याला मराठमोळा लूक करण्यासाठी साध्या सिंपल मेकअप स्टेप्स फॉलो करा. जेणेकरून तुमचा लूक खूपच सुंदर दिसेल.

makeup | yandex

चेहरा स्वच्छ करा

मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चरायझ करा. त्यानंतर चेहऱ्याला प्रायमर लावा. प्रायमरमुळे मेकअप चांगला सेट होतो.

Cleanse Your Face | yandex

हायलायटर

साडीला मॅचिंग शेड्सचे शिमर, हायलायटर, ब्लश लावा. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी कलर करेक्टरचा वापर करा. यामुळे तुमचा चेहरा अधिक ग्लो करतो.

Highlighter | yandex

स्मोकी आइज

आजकाल स्मोकी आइज प्रचंड क्रेझ आहे. डोळ्यांच्या मेकअपमध्ये आयब्रो पेन्सिल आणि मस्कारा लावायला विसरू नका.मेकअपमध्ये मान आणि चेहऱ्याचा स्किन टोन सारखा राहील याची काळजी घ्या.

Smoky Eyes | yandex

लिपस्टिक

तुम्ही जेल बेस लिपस्टिक ऐवजी मॅट बेस किंवा लिक्विड मॅट लिपस्टिकची निवड करा. त्यानंतर मेकअप चांगला सेट करण्यासाठी स्प्रे चेहऱ्यावर मारा.

Lipstick | yandex

NEXT : नऊवारी अन् पैठणीवर शोभून दिसतील मोत्याच्या बांगड्या, 'या' लेटेस्ट सुंदर डिझाइन्स एकदा पाहाच

Motyacha Bangdya Designs | saam tv
येथे क्लिक करा...