Motyacha Bangdya Designs : नऊवारी अन् पैठणीवर शोभून दिसतील मोत्याच्या बांगड्या, 'या' लेटेस्ट सुंदर डिझाइन्स एकदा पाहाच

Shreya Maskar

पारंपरिक लूक

तुम्हाला लग्न समारंभात, पूजेला सुंदर पारंपरिक लूक हवा असेल तर साडीसोबत महाराष्ट्रीयन स्टाइल मोत्यांच्या बंगड्या नक्की घाला. यात तुमच्या हाताचे सौंदर्य खूपच सुंदर दिसते.

Pearl Bangles | instagram

साडी

काठा पदराची साडी, खणाची साडी, नऊवारी आणि पैठणी यांसारख्या साड्यांवर मोत्याचे तोडे-बांगड्या खूपच सुंदर दिसतात. आजकाल बाजारात मोत्यांच्या बांगड्यांचे सुंदर डिझाइन्स आले आहेत.

Pearl Bangles | instagram

वैशिष्ट्ये

मोत्याच्या बांगड्या म्हणजे सौंदर्य, सोज्वळपणा आणि लावण्य होय. मोत्याच्या बांगड्या हा पारंपरिक साज आहे. मराठमोळ्या सणाला हे आवर्जून घाला. साडीसोबत ड्रेसवरही बांगड्या शोभून दिसतात.

Pearl Bangles | instagram

मोत्याच्या बांगड्यांचे प्रकार

मोत्यांच्या बांगड्यांमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. यात प्रामुख्याने मोत्याचे तोडे, कुंदन-मोती जडित बांगड्या, गोल्ड प्लेटेड मोत्याचे कडे पाहायला मिळतात.

Pearl Bangles | instagram

मोत्याच्या बांगड्यांचे रंग

तुम्ही साडीला कॉन्ट्रास्ट रंगाच्या बांगड्या घाला. मोत्याच्या बांगड्या प्रामुख्याने पांढऱ्या , ऑफ-व्हाइट , गुलाबी , गोल्डन रंग उपलब्ध आहेत. सणावाराला हिरव्या, लाल बांगड्यांसोबत मोत्याच्या बांगड्या घाला.

Pearl Bangles | instagram

बांगड्यांची खरेदी

मोत्याच्या बांगड्या खरेदी करताना त्यांची चकाकी , मोत्याचा आकार , रंग आणि पृष्ठभागाची गुळगुळीतपणा तपासावा. खरे मोती चमकदार आणि गोलाकार असतात. बांगड्या मजबूत तारेत किंवा दोऱ्यात गुंफलेल्या असाव्यात.

Pearl Bangles | instagram

बांगड्यांच्या डिझाइन्स

मोत्याच्या बांगड्यांच्या विविध डिझाइन्स पाहायला मिळतात. यात मल्टी-कलर मोत्यांच्या बांगड्या आणि मोगऱ्याच्या कळ्यांच्या डिझाइन्स खूप आकर्षण आहे.

Pearl Bangles | instagram

शॉपिंग

तुम्हाला ऑनलाइन मोत्याच्या बांगड्यांचे सुंदर डिझाइन्स पाहायला मिळतील. भुलेश्वर मार्केट आणि दादर हिंदुमाता मार्केटला तुम्ही शॉपिंग करायला जाऊ शकता.

Pearl Bangles | instagram

NEXT : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Chanakya Niti | saam tv
येथे क्लिक करा...