Shreya Maskar
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी नातेसंबंध, जीवनशैली यांवर आपले स्पष्ट मत मांडले आहे. चाणक्य नीतीनुसार, काही लोक तुमच्या आयुष्यात नकारात्मक घेऊन येतात, त्यामुळे अशा लोकांना तुमच्या घरी आमंत्रित करू नये.
स्वार्थी लोकांना कधीही तुमच्या घरी आमंत्रित करू नये. स्वार्थी लोक फक्त स्वतःबद्दल विचार करतात. जेव्हा तुमच्या घरी येतात तेव्हा, ते फक्त तुमचा फायदा घेतात. तसेच नकारात्मक विचार मांडतात.
चांगले आयुष्य घडवण्यासाठी दुटप्पी लोकांपासून चार हात लांब रहावे. ही सर्वात घातक असतात. जे तुमच्या तोंडावर एक आणि तुमच्या पाठीमागे दुसरे बोलतात. असे लोक तुमच्या घरात आणि नातेसंबंधात भांडणे निर्माण करतात.
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे आपल्याकडे कोणाची ना कोणाची बुराई करतात. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानतात. पुढे जाऊन हीच लोक तुमच्या बाबतीतही असे वागतात. या लोकांना कोणाची प्रगती पाहवत नाही.
आजकालच्या दुनियेत प्रत्येकजण आधी स्वतःचा विचार करतात. लोकांचा गरजेनुसार वापर करून घेतात. त्यांना तुमची गरज असते तेव्हाच तुमची आठवण येते अशा लोकांना तुम्ही घरी बोलावू नये. असे लोक स्वार्थी असतात, त्यांचा उद्देश पूर्ण झाला की तुम्हाला सोडून जातात.
चाणक्य नीतीनुसार, जास्त गोड बोलणारी लोक देखील घातक असतात. गोड बोलून तुमच्याबद्दल सर्व माहिती घेतात आणि नंतर तुमच्याच विरोधात जातात.
ही लोक फक्त तुमची इतरांसोबत तुलना करताना दिसणार. तुम्हाला कमी लेखून तुमच्यात नकारात्मक भावना निर्माण करणार. तुम्ही जर त्यांच्या पुढे असाल/ तुमच्याकडे चांगले यश असेल तर तुम्हाला चुकीचे सल्ले देऊन तुमचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करणार.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.