Shreya Maskar
चाणक्यांनी कायम आनंदी आणि संतुलित जीवनाचे महत्त्व सांगितले आहे. चाणक्यांच्या मते 'या' ज्यांच्याकडे तीन विशेष गोष्टी असतात ते पृथ्वीवर स्वर्गाचा आनंद घेऊ शकतात.
चाणक्य नीतीनुसार, जो मुलगा आपल्या पालकांचा आदर करतो. त्यांना आपले मार्गदर्शक मानतो, अशा घरात आनंद टिकतो. सुख, समृद्धी नांदते.
तो मुलगा कौटुंबिक मूल्य जपतो. घरातील त्याच्या जबाबदाऱ्या समजून घेतो. तो एक चांगला मुलगा, भाऊ, पती, वडील, मित्र आणि सहकारी बनतो.
घराच्या सुखासाठी सुसंवादी वैवाहिक जीवन आवश्यक आहे. त्यासाठी आयुष्यात येणार बायको मनमिळावू , समजून घेणारी, खंबीर साथ देणारी पाहिजे.
जर तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप विश्वास ठेवत असेल तर हे एक स्वर्ग सुख आहे. चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीला आधार देणारा जीवन साथीच त्यांचे जीवन खरोखर स्वर्गासारखे बनते.
प्रत्येक गोष्टीत समाधानी मन ठेवा. विशेषता तुमच्याकडे असलेल्या संपत्तीत समाधानी राहा. जास्त लोभ चांगला नाही. समाधानी राहिल्यामुळे मानसिक शांती लाभते.
चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती आपल्या उत्पन्नावर आणि उपलब्ध संसाधनांवर समाधानी असतो तो नेहमीच लोभ, विसंगती आणि तणावापासून मुक्त असतो. परिणामी, तो लहान लहान गोष्टीत आनंदी राहायला शिकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.