Gudi Padwa 2026: गुढीपाडवा का साजरा केला जातो? 2026 ची तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

Gudi Padwa 2026 Date: गुढी पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. 2026 मध्ये गुढी पाडवा कधी आहे, त्याची तारीख, धार्मिक महत्त्व आणि परंपरा जाणून घ्या.
Gudi Padwa
Why To Celebrate Gudi Padwa?Saam Tv
Published On

भारतातील वेगवेगळ्या भागात नवीन वर्ष वेगवेगळ्या परंपरेनुसार साजरं करण्यात येतं. गुढीपाडवा हा त्यापैकीच एक नवीन वर्षाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. गुढी पाडव्याला चैत्र प्रतिपदा, गुढी पाडवा आणि युगादी असंही म्हटलं जातं.

महाराष्ट्रात गुढी पाडवा हा नवीन वर्षाचा प्रारंभ आहे. त्यामुळे मराठी लोकं हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्राबरोबरच गोवा, दक्षिण भारत आणि भारतातील इतर अनेक भागात गुढी पाडवा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाची सुरुवात आहे, ज्याला विक्रम संवत म्हणून ओळखलं जातं. चला जाणून घेऊया २०२६ मध्ये गुढी पाडवा कधी आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे?

Gudi Padwa
Budh Gochar: 30 ऑगस्टपासून 'या' राशीचं नशीब पालटणार; बुध करणार सूर्याच्या राशीत प्रवेश, प्रत्येक कामातून मिळणार पैसा

गुढी पाडवा 2026 तारीख

कॅलेंडरनुसार, गुढी पाडवा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सुरू होतो. प्रतिपदा तिथी १९ मार्च रोजी सकाळी ६:५२ वाजता सुरू होईल आणि २० मार्च रोजी पहाटे ४:५२ पर्यंत चालणार आहे. तिथीनुसार, गुढी पाडवा १९ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाईल. चैत्र नवरात्र देखील याच दिवशी सुरू होईल.

काय आहे गुढीपाडव्याचं महत्त्व?

गुढी पाडवा हा एक अतिशय शुभ दिवस मानला जातो. या शुभ दिवशी मराठी लोक त्यांच्या घराबाहेर किंवा छतावर गुढी बांधतात आणि त्याची पूजा करतात. ही गुढी सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानण्यात येतं.

Gudi Padwa
Budh Gochar: 30 ऑगस्टपासून 'या' राशीचं नशीब पालटणार; बुध करणार सूर्याच्या राशीत प्रवेश, प्रत्येक कामातून मिळणार पैसा

गुढी पाडव्याशी अनेक धार्मिक श्रद्धा जोडल्या जातात. असं मानलं जातं की, ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली. दुसऱ्या एका मान्यतेनुसार, सतयुगाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला झाली अशीही मान्यता आहे. मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिवशी युद्ध जिंकलं म्हणून गुढी पाडव्याला लोक हिंदुत्वाच्या विजयाचं प्रतीक म्हणून त्यांच्या घराबाहेर गुढी उभारतात, अशीही काही लोकांची धारणा आहे.

Gudi Padwa
Shukra Nakshatra Gochar: 11 फेब्रुवारी रोजी शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश; नशीब झपाट्याने बदलून हाती येणार पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com