Adi Mudra Benefits: मानसिक शांतीसह अन्य आजारांतून मुक्ती देते आदि मुद्रा; जाणून घ्या नेमकी पद्धत

How To Do Adi Mudra: सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक व्यक्तींना स्वत:च्या शरीराची काळजी घेण्यास जमत नाही. मात्र तुम्ही आदि मुद्रा करुन तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता.
Adi Mudra Benefits: मानसिक शांतीसह अन्य आजारांतून मुक्ती देते आदि मुद्रा; जाणून घ्या नेमकी पद्धत
Adi MudraSaam Tv
Published On

अलिकडे प्रत्येक व्यक्तीला असलेला कामाचा व्याप अत्यंत वाढलेला आहे. दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्रीचा शेवट व्यक्तीचा संपूर्ण कामात जातो.याच कामाच्या गोंधळामुळे व्यक्तीला त्याच्या आरोग्यावर लक्ष देणे अजिबात शक्य होत नाही. त्यामुळे व्यक्तीला दैंनदिन योगा करणे किंवा व्यायाम करणे शक्य होतच नाही. मात्र तुमच्या कामाच्या काही वेळात तुम्हाला तुमचे आरोग्य आता चांगले ठेवण्यासाठी एक उपाय मिळाला आहे.

Adi Mudra Benefits: मानसिक शांतीसह अन्य आजारांतून मुक्ती देते आदि मुद्रा; जाणून घ्या नेमकी पद्धत
Monsoon Health Care Tips: कडक उन्हाळ्यात सुरू झाला पावसाळा, अशी घ्याल स्वत:ची काळजी

पूर्वीच्या काळातील व्यक्तींचे आरोग्य (Health)अधिक चांगले राहत असत. त्याचे एक रहस्य म्हणजे योग मुद्रा. जर तुम्हालाही तुमचे आरोग्य चांगले राहावे असे वाटत असल्यास तुम्ही दररोज योग मुद्रेचा समावेश तुमच्या जीवनात करावा.

ज्या प्रमाणात योगा केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.त्याच प्रमाणेही योग मुद्रेच्या मदतीनेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मात्र योग(yoga) मुद्रेत अनेक अशी आसने जी तुमच्या शरीरातील वाहिन्या सक्रिय करतात. योग मुद्रेत बोटांच्या मदतीने केलेली ही आसने शरीरातील रक्तप्रवाह चांगला करण्यासाठी तसेच अनेक आरोग्यासंबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊयात आदि मुद्रा करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे.

श्वसनासंबंधित समस्या असल्यास आदि मुद्रा फायदेशीर...

फुफ्फुसांमधील सुज

जर तुम्हाला फुफ्फुसांसंबंधित कोणतीही समस्या असलेल्या तुम्ही दररोज आदि मुद्रा करावी. याने फुफ्फुसाची जळजळ कमी होण्यास मदत होते शिवाय श्वसन प्रणाली मजबूत होण्यासही मदत होते.

फुफ्फुसांमधील इन्फेक्शन

दैंनदिन आदि मुद्रा केल्याने फुफ्फुसांमधील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील ऊर्जेची पातळी चांगली करण्यासही मदत होते. शिवाय ज्या व्यक्तींना दम्याचा(asthma) त्रास आहे त्यांनीही आदि मुद्रा करावी.

सर्दीची समस्या

सध्या प्रत्येक व्यक्तीला सर्दीचा (cold )त्रास सहज होतो. त्यामुळे अनेक घरगुती उपायांपासून ते वैद्यकीय उपाय करताना व्यक्ती दिसून येतो. मात्र जर तुम्ही दररोज आदि मुद्रा केली तर तुम्हाला सर्दीची समस्या कमी होण्यास मदत होते.

मानसिक शांती

सध्याच्या धावपळीच्या जगात व्यक्ती अनेक मानसिक समस्येमधून जात असतो. अशात मानसिक शांती नीट राहणे आवश्यक असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज आदि मुद्रा केल्यास तुम्हाला फायदा दिसून येईल.

किती वेळा करावा

आदि मुद्रा विषयी महत्त्वाची माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला हमखास प्रश्न (question)पडलाच असेल आदि मुद्रा दिवसातून किती वेळा करावा आणि किती वेळ करावा. तुमच्या रोजच्या धावपळीच्या वेळातून तुम्ही आदि मुद्रा ही साधारण १५ ते २० मिनिटांपर्यंत करु शकता मात्र आदि मुद्रा करण्यासाठी विविष्ट अशी वेळ नाही ती तुम्ही दिवसातून कितीही वेळा करु शकता.

Adi Mudra Benefits: मानसिक शांतीसह अन्य आजारांतून मुक्ती देते आदि मुद्रा; जाणून घ्या नेमकी पद्धत
Health Care Tips: 'या' व्यक्तींनी हिंगाचे अतिसेवन करणं टाळावं, नाहीतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com