Indrayani River : इंद्रायणी नदीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात! नदी पात्रातील पाणी साबणासारखं का फेसाळतंय?

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीपात्रात नजर जाईल तथपर्यत फेसच दिसतोय. इंद्रायणी नदी पात्रातील पाणी फेसाळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील इंद्रायणी नदी पात्रील पाणी अशा पद्धातीने फेसाळले आहे.
Indrayani River Pollution
Indrayani RiverSaam TV
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

आषाढी वारी सोहळा काहीच दिवसांवर आला असताना आळंदीत वारकरी सांप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदीतील पाण्याला फेस आला आहे. इंद्रायणी नदी पात्रातील पाणी फेसाळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील इंद्रायणी नदी पात्रील पाणी अशा पद्धातीने फेसाळले आहे.

Indrayani River Pollution
Tourists Drowned In Indrayani River : मुंबईतील पर्यटकांचा ग्रुप वर्षासहलीसाठी आला होता, दोघांचा बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीपात्रात नजर जाईल तथपर्यत फेसच दिसतोय. आळंदीत येणारा प्रत्येक वारकरी इंद्रायणीच्या नदीपात्रात स्थान करुन पुढे माऊलींच्या चरनी नतमस्तक होतो. तसेच पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतो. अशात आता आषाढी वारी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर आलं आहे. मात्र इंद्रायणी नदीची अशी अवस्थापाहून वारकरी सांप्रदाय चिंतेत आहे.

इंद्रायणी नदी पात्राशेजारी अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमधील रासायनीक पाणी थेट नदी पात्रात सोडलं जातं. त्यावरून अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून या कंपन्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांसह वारकऱ्यांनी पुन्हा एकदा तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हिवाळी अधिवेशनात काय घडलं?

इंद्रायणी नदीचा प्रश्न याआधी देखील पेटला होता. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी राज्यसरकारला धारेवर धरलं होतं. महाराष्ट्र नियंत्रण मंडळाने यावर आम्ही सहा कंपन्या बंद केल्याचं सांगितलं होतं. तसेच अवैधरित्या चालणाऱ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले होते. मात्र या कारवाईचे पुढे काय झाले आणि ही कारवाई खरोखर झाली आहे की नाही, असा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. तसेच जर ही कारवाई झाली आहे, मग तरिही इंद्रायणी नदी पात्रातील पाणी का फेसाळतंय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Indrayani River Pollution
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करा, कार्ला मळवली ग्रामस्थ आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com