Tourists Drowned In Indrayani River : मुंबईतील पर्यटकांचा ग्रुप वर्षासहलीसाठी आला होता, दोघांचा बुडून मृत्यू

Maval Latest News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मावळ परिसराला झाेडपून काढले आहे.
Drowning, Indrayani River, Maval News, lonavala police
Drowning, Indrayani River, Maval News, lonavala policesaam tv
Published On

Maval News : मावळच्या वरसोली गावाजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांक पानचंद व्होरा व विजय सुभाष यादव अशी या बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत.  (Maharashtra News)

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (lonavala police) दिलेल्या माहिती नुसार मुंबई भागातील सहा जणांचा ग्रुप लोणावळा परिसरात वर्षा सहलीसाठी आला होता. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते वरसोली गावातील माळाकडे फिरायला गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या खाणीत प्रियांक, विजय व जेनिया हे तिघे उतरले असता पाय घसरल्याने ते तिघेही पाण्यात पडले.

Drowning, Indrayani River, Maval News, lonavala police
Pune Crime News : रोझरी स्कूलनजीक टाेळक्याचे पाेलिसांवर गाेळीबार, एक जखमी; झटापटीनंतर 5 अटकेत (पाहा व्हिडिओ)

त्यावेळी त्याचे इतर सहकारी आणि स्थानिकांनी लागलीच त्यांना पाण्यातून बाहेर काढले मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने प्रियांक व विजय यांचा मृत्यू झाला. अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत.

कुंडमळ्यात बुडून मृत्यू

दरम्यान पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) मधील काही कामगार आपल्या मित्रांसोबत वर्षाविहार करण्यासाठी मावळच्या शेलारवाडीतील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा इथे आले होते. मात्र धोकादायक पद्धतीने पर्यटन करत असताना ओंकार गायकवाड याचा पाय घसरून धबधब्यात पडला. त्याचा शोध मावळ वन्यजीव रक्षक, एनडी आरएफ टीम आणि स्थनिक ग्रामस्थ घेत होते.

Drowning, Indrayani River, Maval News, lonavala police
Kolhapur News : कोल्हापूरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, खेडच्या जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

मात्र शोध कार्यात अनेक अडचणी येत होते. वारंवार पडणारा पाऊस तसेच इंद्रायणी नदीचा वाढलेला प्रवाह या अनेक अडचणींवर मात करत अखेर तेवीस तासानंतर तरुणाचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलं.

टाटा मोटर्सचा कामगार आपल्या मित्रांसोबत वर्षाविहाराचा आनंद घेण्यास कुंडमळ्यावर आला होता मात्र वाहत्या पाण्यात उभा राहून मस्ती करताना पाय घसरून खोल पाण्यात पडला असे पाेलिसांनी घडलेल्या घटनेबाबत सांगितले.

ओंकार गायकवाड असं या कामगाराचे नाव आहे. वर्षा विहाराचा बेत ओंकार गायकवाडच्या जीवावर बेतला. मात्र पाण्यात पडण्यापूर्वी काही मिनीटापूर्वी मृतक ओंकार गायकवाड याने काढलेला सेल्फी व्हिडीओ सध्या सोशियल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com