Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या 4 जूननंतर शिफ्ट करणार; दुर्घटनेनंतर उदय सामंत यांची माहिती

Uday Samant Decision on Dangerous Company in Dombivli: डोंबिवलीकरांनी धोकादायक केमिकल कंपन्या शिफ्ट करण्याची मागणी केली होती. मात्र आचारसंहितेमुळे काम थांबलं होतं. या कंपन्यासांठी जागाही शोधण्यात आली असून ४ तारखेनंतर कंपन्या शिफ्ट केल्या जातील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या 4 जूननंतर शिफ्ट करणार; दुर्घटनेनंतर उदय सामंत यांची माहिती
Uday Samant on Dombivli MIDC Fire UpdateSaam Digital

डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. आग आटोक्यात आली असून कंपन्यांमध्ये कोणी अडकलं आहे का याचा शोध घेण्यात येत आहे. ६ मृतदेह सापडल्याची माहिती त्यांनी दिली, तसंच धोकादायक केमिकल कंपन्या शिफ्ट करण्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या 4 जूननंतर शिफ्ट करणार; दुर्घटनेनंतर उदय सामंत यांची माहिती
Dombivli MIDC Fire Update: डोंबिवली MIDC आगीत ६ जणांचा मृत्यू, ३४ जखमींवर उपचार सुरू

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील धोकादायक कंपन्या शिफ्ट करण्याची मागणी डोंबिवलीकरांनी अनेक दिवसांपासून लावून धरली होती, मात्र आचारसंहिता असल्यामुळे हे काम थांबलं होतं. ४ जूननंतर केमिकल कंपन्या शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दुर्घटनेतील सर्व जखमींचा खर्च सरकार उचलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं जाहीर केलं आहे. मात्र घटना दुर्दैवी आहे. या कंपन्यांमध्ये नियमबाह्य काही झालं आहे का? याची तपासणी करण्याच्या स्पष्ट सूचना अग्निशमन दलाला दिल्या आहेत. तसंच या घटनेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

डोंबिवली परिसरातील सर्व धोकादायक कंपन्या शिफ्ट करण्यात येणार आहेत. वर्षभर यावर काम सुरू आहे. जागा शोधण्यात आली आहे, मात्र अद्याप जागेचं वाटप करण्यात आलेलं नाही. ४ तारखेनंतर जागेचं वाटप होईल. कंपन्या शिफ्ट करण्याच्या डोंबिवलीकरांच्या मागणीवर धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंबरनाथ परिसरात शेकडो एकर जागा घेण्यात आली आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

जखमींवर एम्समध्ये उपचार - श्रीकांत शिंदे

एमआयडीसीत झालेल्या दुर्घटनेत ३० जण जखमी झाले असून त्यांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच जखमींना सर्व ती मतद करणार असल्याचं आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.

Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या 4 जूननंतर शिफ्ट करणार; दुर्घटनेनंतर उदय सामंत यांची माहिती
Dombivli Fire : कंपनीत पहिला स्फोट कशामुळं झाला? डोंबिवली आगीच्या घटनेवर बोलताना CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com