सध्या मे महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हाळ्याच्या दिवसात काल अचानक पावसाने हजेरी लावली. काल आलेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांचेच नुकसान झाले.
पावसाळा सुरू होण्याआधी आरोग्याची (Health) काळजी घ्यावी लागते. अनेकजण खाण्यापिण्यापासून सर्वच गोष्टींकडे विशेष लक्ष देतात. मात्र काल अचानक आलेल्या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. सर्वत्र मोठे नुकसान झाले.
मे महिन्याचा शेवट आणि पावसाळा (Rainy Season) सुरू होण्यापूर्वी आरोग्यविषयक स्वत:ची विशेष काळजी घेतली जाते. ऋतू बदलला की सगळ्यात आधी आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाच्या पाण्यात भिजल्याने आरोग्य बिघडते तसेच या वातावरणीय बदलामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
पावसाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. तसेच रोगप्रतिकारशक्तीकडे लक्ष द्यावे लागते. मात्र अचानक आलेल्या पावसाळ्यात काय सावधगिरी बाळगावी हे लक्षात घ्या
अचानक आलेल्या पावसाळ्यात काय काळजी घ्याल
१) शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी सोबत ठेवा.
२) बाहेरचे उघड्यावरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळा.
३) मे आणि जून वातावरणीय बदलांमुळे त्वचेवर देखील परिणाम होतो यामुळे त्वचा क्लिनझींग, मॉइश्चरायझिंग सोबत ठेवा.
४) बाहेरून फळे आणि भाज्या आणल्यानंतर सर्वप्रथम धुवून घ्या.
५)अचानक होणाऱ्या हवामान अंदाज लक्षात घेऊन छत्री, रेनकोट किंवा जॅकेट सोबत ठेवा.
६) रोज नियमित व्यायाम करत राहा. व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
७) हवामान तसेच पर्यावरणीय बदलांमुळे घाबरून जाऊ नका. तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. यासाठी घरच्यांच्या व मित्रमैत्रिणीच्या संपर्कात राहा.
डिस्क्लेमर: सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Manasvi Choudhary