Maharashtra Rain News
Maharashtra Rain NewsSaam Digital

Maharashtra Rain News : राज्यभरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान; मुंबईत धुळीचं वादळ

Rain News : मुंबईसह आज राज्यभर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे, काही ठिकाणच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

मुंबईसह आज राज्यभर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे, काही ठिकाणच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. आज लोकसभेच्या ११ मतदारसंघासाठी मतदान सुरू असून पावसामुळे काही ठिकाणी मतदान केंद्र बंद करावी लागली आहेत. हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाची इशारा दिला होता. त्यानंतर आज दुपारनंतर राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.

हिंगोलीत मुसळधार,बागायतदार अडचणीत

हिंगोली जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं आहे. हिंगोली तालुक्यातील वरूड, पुसेगाव, नरसी पहेनी, वैजापूर, सरकळी, हळदवाडी, जांभरून गिलोरी, चांगेफळसह परिसरात मागील अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र बागायतदार शेतकरी चिंतेत सापडला आहे.

रायगड जिल्‍ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

रायगडच्‍या उत्तर भागात संध्‍याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कर्जत, खालापूर, पेण अलिबाग तालुक्‍यांमध्‍ये वादळी वारयासह जोरदार पाऊस बरसाला. संध्‍याकाळी आलेल्‍या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसा सोबत काही ठिकाणी गारा पडल्या. पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबईसह, कोकण आणि कोल्‍हापूर भागात अवकाळीचा अंदाज वर्तवण्‍यात आला होता. रायगड जिल्‍ह्यात हवामान खात्‍याने 15 मे पर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

Maharashtra Rain News
Mumbai Local Train News: वादळी पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेसेवा विस्कळीत; नोकरदारांचे हाल

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळाला आहे. मात्र फळबाग शेतींना याच्या मोठा फटका बसणार आहे. तसेच मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या पावसामुळे मतदानाच्या टक्केवारीवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालघर जिल्ह्यात  वीज पडून 3 जण जखमी

पालघर जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी वादळी पावसात वीज पडून 3 जण जखमी झाले आहेत. डहाणू तालुक्यातील आंबोली कोकणपाडा येथील तरुण अचानक पाऊस आल्यामुळे झाडाखाली आसरा घेतला होता. त्यावेळी वीज पडून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर तलासरी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यात डहाणू, चारोटी,तलासरी ,जव्हार ,मोखाडा भागात विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

Maharashtra Rain News
Badlapur - Dombivli Rain: बदलापूर- डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, VIDEO मधून बघा पावसाचं रौद्ररूप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com