Hair Combed At Night
Hair Combed At Nightadobe

Hair Care tips: रात्री केस विंचरुन झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Hair Combed At Night : रात्री झोपण्याआधी केस विंचरावे का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. किंवा कोणी तुम्हाला प्रश्न केला तर, केस विंचरुन झोपावे का? या प्रश्नांचं उत्तर अनेकांकडे नसतं.

उन्हाळ्यात केस कोरडे दिसू लागतात. हे तीव्र सूर्यप्रकाश आणि अति उष्ण हवामानामुळे होत असते. केसांमध्ये आर्द्रतेचा अभाव कायम राहिल्यास केसांचे अनेक प्रकारे नुकसान होते. त्यामुळे केसांवर हेअर मास्क, तेल लावणे किंवा इतर उपाय करावे. या उपयांमध्ये केसांची काळजी घेणंही आहे. केसांना कंगवा केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि टाळूवरील घाणही निघून जाते.

भारतात प्राचीन काळापासून केसांना कंगवा करणे खूप चांगले मानले जाते. स्त्री असो वा पुरुष, केसांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण केस विंचरत असतो. आता रात्री केस विंचरल्यानंतर झोपावे की नाही हा प्रश्न आहे. कंगवा करण्याबाबत अनेक समज पसरवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे रात्री केस विंचरावे की नाही. अनेकांना वाटते की केस विंचरल्याने केस गळू लागतात. पण असं काही होत नाही. रात्री केसांना तेल लावून झोपणे चुकीचे आहे कारण यामुळे रात्रभर केसांमध्ये माती किंवा घाण अडकून राहते. पण रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरावेत कारण त्याचे अनेक फायदे आहेत.

केसांची चमक आणि सौंदर्य टिकवण्यासाठी टाळूचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. जर रक्ताभिसरण कमजोर असेल तर केस गळण्याची शक्यता वाढते. तेल लावण्याबरोबरच केसांना कंगवा करणं टाळूमध्ये रक्तप्रवाहही सुधारत असतं. केसांना कंगवा केल्याने म्हणजेच ते विंचरल्याने केसांना योग्यरित्या ऑक्सिजन मिळते. ऑक्सीजन मिळाल्याने केस मजबूत होतात शिवाय त्यांची वाढ सुद्धा चांगली होत असते.

जर तुम्ही तुमच्या केसांना योग्य प्रकारे कंगवा करत राहिलात आणि नैसर्गिक तेल योग्य प्रकारे लावत राहिलात तर त्याचा फायदा होत असतो. तेल टाळू आणि केसांमध्ये पसरते ज्यामुळे केसांची वाढ सुधारते. याशिवाय केसही चमकदार दिसतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना कंगवा करावा. रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरले तर केस गळतात असं अनेकांना वाटतं परंतु तसं नाहीये. उलट रात्री केस विंचरल्याने केसांमधील गुंता सुटत असतो आणि केस गळण्याचा धोका कमी होत असतो. केसांना कंगवा केल्याने केस गळण्याचा कमी असतो.

केस विंचरुन झोपल्याने तणावही दूर होत असतो. तुम्हाला चांगली झोप लागते, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटते. जर झोपेची व्यवस्था बिघडली असेल म्हणजेच नीट झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम कामावर दिसून येतो. केसांना रात्री कंगवा केल्याने टाळू आणि मनाला आराम मिळत असतो. तुम्ही रात्री नियमितपणे केसांना कंगवा करत असाल तर मानसिक ताण कमी होत असतो.

Hair Combed At Night
Home Remedies for Bad Breath: तोंडाची दुर्गंधी ५ मिनिटांत दूर होईल; फॉलो करा 'या' ५ टिप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com