Priya More
प्रत्येक भारतीय व्यक्तींच्या स्वयंपाकघरात हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
हिंग फक्त चवीसाठी उत्तम नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. भाज्या, वरण, सांबराला फोडणी देताना हिंग वापरतात.
हिंग जेवणाची चव वाढवते खरं पण त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
हिंगाचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
हिंग खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते. परंतु त्याचे अधिक सेवन केल्याने पोटात गॅस, जुलाब आणि जळजळ होऊ शकते.
गरोदरपणात हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका असतो.
तुम्ही स्तनपान करणारी महिला असाल तर हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचा परिणाम बाळावर होतो आणि बाळाची प्रकृती बिघडण्याची शक्यता असते.
हिंगाचे जास्त सेवन उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. या रुग्णांनी हिंगापासून दूरच राहावे आहे.
हिंग हे नॅचरल ब्लड थिनर म्हणून ओळखले जाते जे रक्त पातळ करण्याचे काम करते. याव्यतिरिक्त ते रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते.
हिंगाच्या अतिसेवनामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतात. त्वचेवर लाल फोड्या येऊन खाज सुटू लागते.