Siddharth Jadhav : कर्तव्य तत्पर मुंबई पोलिसांचे सिद्धार्थ जाधवने मानले आभार; नेटकऱ्यांकडून सिद्धूवर कौतुकाचा वर्षाव

Siddharth Jadhav Shared Mumbai Police Post : मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने अख्ख्या मुंबईला चांगलंच झो़डपून काढलं आहे. या पावसात अहोरात्र उभं राहून काम करणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सिद्धार्थ जाधवने आभार मानले.
Siddharth Jadhav News
Siddharth Jadhav Shared Mumbai Police PostSaam Tv

संपूर्ण मुंबईमध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अख्ख्या मुंबईला चांगलंच झो़डपून काढलं आहे. या पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाईनलाही पावसाचा फटका बसल्याने मुंबई लोकल पुर्णत: विस्कळीत झाली होती. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मुंबई पोलिस तहान भूक विसरून नागरिकांच्या मदतीला धावून आले.

Siddharth Jadhav News
Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड

सणवार, वारा, पाऊस किंवा ऊन असो, कायमच मुंबई पोलिस मुंबईकरांच्या मदतीसाठी उभे असतात. कालच्या झालेल्या पावसातही मुंबई पोलिसांनी अहोरात्र काम करून जनतेला एक हात मदतीचा दिला. त्यांच्या ह्या कामाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. सध्या सर्वत्र मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक होत असून यामध्ये मराठी अभिनेताही सामील झाला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Siddharth Jadhav News
Game Changer : "आता अख्खा गेमच बदलणार...", कियारा अडवाणी आणि रामचरणने 'गेम चेंजर'बद्दल चाहत्यांना दिली महत्वाची अपडेट

आज (सोमवार) मुंबई पोलि‍सांची सिद्धार्थने इन्स्टा स्टोरीवर भेट घेतल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. सिद्धार्थ शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थने ट्राफिक पोलिसांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत एक सेल्फी शेअर केलेली आहे. अभिनेत्याने मुंबई पोलिसांना टॅग करत ही सेल्फी शेअर केलेली आहे.

मुंबई पोलिसांनी अभिनेत्यासोबतची सेल्फी इन्स्टाग्रामवर रिशेअर करत त्याचे आभार मानले आहेत. सध्या सिद्धार्थ जाधवच्या ह्या कृत्याचं कौतुक होत आहे. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ मुंबई पोलिसांसोबत संवाद साधतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, अभिनेता सर्व पोलिस बांधवांची चौकशी करताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेता त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे.

Siddharth Jadhav News
Siddharth Jadhav Shared Mumbai Police PostInstagram

सिद्धार्थ कायमच त्याच्या सामाजिक बांधिलकीमुळे, कॉमेडीमुळे आणि फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अनेकदा अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. सध्या ह्या व्हिडिओमुळे अभिनेत्यांचं पुन्हा एकदा सोशल मीडियावर कौतुक होतं आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Siddharth Jadhav News
Bigg Boss OTT 3 : "अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा", विशाल पांडेचे आई-वडील संतापले; नेमकं काय घडलं?

सिद्धार्थ जाधवच्या कामाबद्दल बोलायचे तर, नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' सीरीजमध्येही सिद्धार्थ जाधव दिसणार आहे. त्याच्यासोबत सई ताम्हणकर ही दिसणार आहे. शिवाय, सिद्धु सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २' मध्येही दिसणार आहे. त्याने या चित्रपटाचे गेल्या काही दिवसांपूर्वी डबिंग पूर्ण केले आहे.

Siddharth Jadhav News
Munisha Khatwani Eliminated : बिग बॉसच्या घरातून मुनिषा खटवानी नॉमिनेट, बिग बॉसने अरमान मलिकला सुनावली मोठी शिक्षा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com