तेलुगू फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री सौम्या जानू सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सौम्या जानूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौम्याने भररस्त्यात राडा करत ट्राफिक पोलिसाचे कपडे फाडले. ऐवढ्यावर न थांबता तिने पोलिसाचा मोबाईल देखील हिसकावला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स अभिनेत्रीवर टीका करत आहेत. नेटिझन्सनी सौम्या जानूवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हैदराबादच्या बंजारा हिल्स भागामध्ये घडली आहे. रविवारी २५ फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. सौम्या जानू या भागामधून चुकीच्या रस्त्यावरून कार चालवत होती. त्यामुळे ट्राफिक पोलिसाने सौम्याच्या कारला अडवले. यावेळी सौम्याने ट्राफिक पोलिसाला सहकार्य करण्याऐवजी त्याच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तिने ट्राफिक पोलिसाला शिवीगाळ करण्यास आणि उद्धटपणे बोलण्यास सुरूवात केली.
सौम्याने रस्त्यावर गाडी उभी करून ट्राफिक पोलिसासोबत भांडण करत गोंधळ केला. त्यामुळे घटनास्थळावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत सौम्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ती काही शांत झाली नाही. ती आरडाओरडा करत राहिली. त्यांनी हस्तक्षेप करून देखील ती शांत झाली नाही. सौम्या जानू ट्राफिक पोलिसासोबत भांडतच राहिली. पण या घटनेची नोंद करणाऱ्या ट्राफिक पोलिसावर तिने हल्ला केल्याने हे प्रकरण आणखी बिघडले. सौम्याने ऐवढ्यावरच न थांबता ट्राफिक पोलिसाचे कपडे फाडले आणि त्याचा मोबाईलही हिसकावला.
हल्ल्यानंतर ट्राफिक पोलिसाने बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली. पुरावा म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओही बंजारा हिल्स पोलिसांना दिला. पोलिसांनी याप्रकरणी सौम्या जानूविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ट्राफिक पोलिसाच्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी तिच्या या कृत्याचा निषेध केला. त्याचसोबत ते सौम्या जानूवर टीका करत तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.