Sai Lokur
Sai LokurSaam Tv

Sai Lokur: मला तुमची खूप दया येते, लज्जास्पद म्हणत सई लोकूरने वाढत्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर

Sai Lokur Answered To Trollers: काही दिवसांपूर्वी सई लोकूरच्या जीवलग मैत्रिणी मेघा धाडे आणि शर्मिष्ठा राऊत यांनी तिची भेट घेतली होती. बिग बॉसच्या घरामध्ये या तिघींची मैत्री झाली होती. सईच्या लग्नाला देखील त्यांनी हजेरी लावत धम्माल केली होती.
Published on

Sai Lokur Trolled:

बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सध्या आपल्या मुलीसोबत क्वालिटी टाइम इन्जॉय करत आहे. सई लोकूरने १७ डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. घरामध्ये चिमुकलीचं आगमन झाल्यामुळे सध्या सईच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. सईने आपल्या मुलीचं नाव 'ताशी' असं ठेवलं आहे. बाळ झाल्यानंतर सईला आणि तिच्या मुलीला भेटण्यासाठी अनेक जण तिच्या घरी जात आहेत. अशामध्ये काही दिवसांपूर्वी सई लोकूरच्या जीवलग मैत्रिणी मेघा धाडे आणि शर्मिष्ठा राऊत यांनी तिची भेट घेतली होती. बिग बॉसच्या घरामध्ये या तिघींची मैत्री झाली होती. सईच्या लग्नाला देखील त्यांनी हजेरी लावत धम्माल केली होती.

मेघा आणि शर्मिष्ठा भेटल्यानंतर सईने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिघींचा एकत्र फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले होते. सईच्या वाढत्या वजनावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. या फोटोवर कमेंट्स करत नेटिझन्सनी तिला वाढत्या वजनावरून टोमणे मारले होते. वजनावरून ट्रोल करणाऱ्यांवर सई लोकूर आता चांगलीच संतप्त झाली आहे. तिने या ट्रोलर्सला इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे. तिने या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Sai Lokur Post
Sai Lokur PostInstagram

सईने या पोस्टमध्ये असे लिहीलं आहे की, 'ज्या स्त्रीने नुकताच एका बाळाला जन्म दिला. त्या स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे यावर मला विश्वासच बसत नाही. त्या स्त्रीला पुन्हा तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरं होण्यासाठी थोडा वेळ तरी द्या. सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. जिथे तुमच्या शरीराचे सहा थर कापले जातात. या शस्त्रक्रियेनंतर खूप बंधने येतात. तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही, काहीही जड उचलू शकत नाही, वाकू शकत नाही, तुमच्या स्तनपानामुळे तुम्ही आहारही घेऊ शकत नाही.'

सई लोकूरने पुढे असे देखील लिहिले की, 'एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यथांमधून जात असते आणि या काळात एखाद्या स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे. या प्रतिक्रियांनी मला आश्चर्य वाटले. पण देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, कारण मला तुमची खूप दया येते. जर लोक थोडे आणखी समजूतदार, आदराने, दयाळू राहिले तर हे जग त्यांना राहण्यासाठी एक चांगले ठिकाण असेल.'

Sai Lokur
Taapsee Pannu Wedding: ठरलं तर मग! मार्चमध्ये तापसी पन्नू होणार Mathias Boe ची नवरी, कधी आणि कुठे होणार लग्न?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com