Taapsee Pannu Wedding: ठरलं तर मग! मार्चमध्ये तापसी पन्नू होणार Mathias Boe ची नवरी, कधी आणि कुठे होणार लग्न?

Taapsee Pannu And Mathias Boe: 'डंकी' फेम अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अशामध्ये आता तापसी पन्नू लवकरच विवाहबंधनात अडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Taapsee Pannu And Mathias Boe:
Taapsee Pannu And Mathias Boe:Saam Tv
Published On

Taapsee Pannu And Mathias Boe Wedding:

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरूवात करत आहेत. नुकताच रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. रकुलनंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. 'डंकी' फेम अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अशामध्ये आता तापसी पन्नू लवकरच विवाहबंधनात अडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तापसी पन्नू लाँग टाईम बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत (Mathias Boe) मार्च महिन्यामध्ये लग्न करणार आहे. तापसी पन्नूच्या लग्नाबाबतचे सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत...

अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत लग्न करणार आहे. तापसी आणि मॅथियास गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशामध्ये आता या कपलने लग्नबंधनामध्ये अडकण्याचा निर्णय घेतला आहे. तापसी पन्नू आणि मॅथियास बो लग्नासाठी तयार झाले आहेत. हे कपल आता 10 वर्षांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करणार आहेत. तापसी लग्न करणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

तापसी पन्नूने देखील इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रेमाणे लग्नासाठी उदयपूरची निवड केली आहे. या लग्नाला फक्त तापसी पन्नू आणि मॅथियास बो या दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार हजेरी लावणार आहेत. आत्तापर्यंतच्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर बॉलिवूडच्या कोणत्याही स्टारला या लग्नासाठी आमंत्रित केले जाणार नाही. उदयपूरमध्ये आतापर्यंत प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी या सेलिब्रिटींनी लग्न केले आहे. आता तापसीने देखील लग्नासाठी याच ठिकाणाची निवड केली आहे.

Taapsee Pannu And Mathias Boe:
Taapsee Pannu Boyfriend: कोण आहे तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड; केलं न्यू इयरचं दणक्यात स्वागत

तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांचे लग्न शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार होणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्चमध्ये हे कपल लग्न करणार आहेत. पण त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही. अद्याप या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तापसी पन्नू गेल्या 10 वर्षांपासून मॅथियास बो याला डेट करत आहे. हे कपल नेहमी सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. पण ते नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात.

Taapsee Pannu And Mathias Boe:
Taapsee Pannu: तापसी पन्नूसोबत फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?, इंडस्ट्रीत होतेय वेगळीच चर्चा

तापसीने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये मॅथियासबद्दल मोकळेपणाने सांगितले होते की, ती तिच्या पहिला बॉलिवूड चित्रपट 'चश्मे बद्दूर'च्या शूटिंगच्या वेळी मॅथियासला भेटली होती. तापसी पन्नूचा होणारा नवा मॅथियास हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. 2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे.

Taapsee Pannu And Mathias Boe:
Taapsee Pannu New Car: अभिनेत्री तापसी पन्नूने खरेदी केली ३ कोटींची आलिशान कार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com