Ramayana: 'रामायणला ऑस्कर मिळालं नाही तर निराशा होईल...'; मुख्यमंत्री फडणवीसांना रणबीर कपूरच्या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा

Devendra Fadnavis on Ramayana : रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ दिवाळी २०२६मध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चित्रपटाला ऑस्कर मिळालं नाही तर निराशा होईल, असं मोठं वक्तव्य केलं.
Devendra Fadnavis on Ramayana
Devendra Fadnavis on RamayanaSaam Tv
Published On

Devendra Fadnavis on Ramayana : दिवाळी २०२६मध्ये प्रदर्शित होणाऱ्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रामायण’बाबत केलेल्या एका वक्तव्याचीही चर्चा रंगली आहे.

‘रामायण’ला ऑस्कर मिळालं नाही तर निराशा होईल

प्रसिद्ध निर्माते नमित मल्होत्रा यांच्या ‘प्राइम फोकस स्टुडिओ’च्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रामायण’ चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं. सीएम म्हणाले, 'रामायण'ला ऑस्कर पुरस्कार मिळाला नाही, तर मला ॲकॅडमी अवॉर्ड्सच्या ज्युरीबद्दल खूप निराशा वाटेल. हा केवळ या दशकातीलच नव्हे, तर या शतकातील सर्वोत्तम चित्रपट आहे."

Devendra Fadnavis on Ramayana
Makeup influencer Death: प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सरचे कार अपघातात मृत्यू; वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिवाळीच्या दोन दिवस आधी प्रदर्शित होणार

नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’चा पहिला भाग ६ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दिवाळीच्या अवघ्या दोन दिवस आधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रामायण’चे दोन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागानंतर दुसरा भाग दिवाळी २०२७च्या आसपास प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis on Ramayana
Jalgaon Gold-Silver Rate: जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; एका दिवसात सोनं-चांदी किती महागलं?

कोण साकारतंय कोणती भूमिका?

रामायण’मध्ये रणबीर कपूर भगवान राम, तर साई पल्लवी सीता माताच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता यश रावणाची भूमिका साकारत आहे. रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत असून, सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. आता ६ नोव्हेंबर २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत खरा उतरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com