Jalgaon Gold-Silver Rate: जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; एका दिवसात सोनं-चांदी किती महागलं?

Jalgaon Gold-Silver Rate: जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोने ८०० तर चांदी तब्बल ५ हजारांनी महागली असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा दरांवर परिणाम झाला आहे.
Jalgaon Gold-Silver Rate
Jalgaon Gold-Silver RateSaam Tv
Published On

जळगाव : जळगावच्या सुवर्णनगरीतील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दरांमध्ये घसरण सुरू असताना आज अचानक बाजाराने यू-टर्न घेतला. सोन्याच्या दरात एका दिवसात ८००, तर चांदीच्या दरात तब्बल ५ हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे.

आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. त्याचवेळी चांदीच्या दराने मोठी झेप घेतल्याने सराफा बाजारात चर्चेला उधाण आले. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे दर कमी झाल्यानंतर खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना पुन्हा महागाईचा सामना करावा लागत आहे.

Jalgaon Gold-Silver Rate
Makeup influencer Death: प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सरचे कार अपघातात मृत्यू; वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सोन्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ

जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात प्रति किलो ८००ची वाढ झाली. जीएसटीविना सोन्याचा दर प्रति किलो १,४८,५०० इतका नोंदवण्यात आला आहे. सोन्याच्या दरातील या वाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. लग्नसराई, सण-उत्सव किंवा इतर शुभकार्यांसाठी सोने खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी दरवाढीचा मोठा फटका जाणवणार आहे.

२४ कॅरेट सोने (१ ग्रॅम): १४,९६८

२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,४९,६७८

२२ कॅरेट सोने (१ ग्रॅम): १३,७२१

२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): १,३७,२०५

Jalgaon Gold-Silver Rate
Dombivli: डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून सुरु होणरा वॉटर मेट्रो; जाणून घ्या संपूर्ण माहिती

चांदीच्या दराने घेतली मोठी झेप

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एका दिवसात चांदी तब्बल ५ हजारांनी महागली असून, जीएसटीविना चांदीचा दर प्रति किलो २,३४,००० इतका झाला आहे. अल्पावधीत झालेल्या या मोठ्या वाढीमुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

१ ग्रॅम २४० – २५०

१० ग्रॅम २,४०० – २,५००

१०० ग्रॅम २४,००० – २५,०००

१ किलो २,४०,००० – ₹२,५०,०००

डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम

सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांचा सोन्या-चांदीकडे वाढलेला कल यामुळे दरांमध्ये तेजी आली आहे. जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने बदल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com