Dombivli: डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून सुरु होणरा वॉटर मेट्रो; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dombivli Ro-Ro Service: डोंबिवली पश्चिमेतील मोठा गणेश घाट रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली. डिसेंबरपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून नवी मुंबई विमानतळापर्यंत विस्ताराचे नियोजन आहे.
Dombivli Ro-Ro Service:
Dombivli Ro-Ro ServiceSaam Tv/AI
Published On

Dombivli Ro-Ro Service: डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुखकर होणार असून त्यांचा प्रवासाचा मोठा भार कमी होणार आहे.कारण डोंबिवली पश्चिमेतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या विकासकामाचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे.

मोठा गणेश घाट परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त होते. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल, खड्डे आणि पाणीसाचत असल्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही काम रखडले होते. अखेर आता काँक्रीटीकरणाच्या कामाला प्रारंभ झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मोठा गणेश घाट परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत होणार आहे. यामुळे परिसरातील विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Dombivli Ro-Ro Service:
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने केलं मुंडण; माहिका शर्मासोबत तिरुमला मंदिरात घेतले श्री वेंकटेश्वरांचे दर्शन

यावेळी बोलताना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मोठागाव परिसरातील जलवाहतूक प्रकल्पाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. मोठागाव येथून जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी घाट परिसरात जेट्टी उभारण्याचे काम सध्या सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजनानुसार डिसेंबरपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यानंतर डोंबिवलीतील नागरिकांना ठाणे तसेच वसई-विरार येथे जलमार्गाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Dombivli Ro-Ro Service:
Shahapur Tourist Death: मुंबईहून फिरायला आला अन् काळाने केला घात; वरपडी नदीत २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

याशिवाय या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात जलवाहतूक सेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तारण्याचे नियोजन असल्याचेही दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. यामुळे डोंबिवलीतील नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाचा करायला मिळेल अशी हमी त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com