Pravin Tarde Debut Tollywood : आरारारा खतरनाक.... प्रवीण तरडेची टॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री, लूक बघून ओळखताच येणार नाही!

Aho Vikramaarka First Look : मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयातून आणि दिग्दर्शनातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्यानंतर प्रवीण तरडे आता टॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Pravin Tarde Debut Tollywood : आरारारा खतरनाक.... प्रवीण तरडेची टॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री, लूक बघून ओळखताच येणार नाही!
Pravin Tarde Aho Vikramaarka Film LookInstagram

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील फेमस अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या विशेष कलाकृतीने महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळवली आहे. 'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद', 'धर्मवीर', 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलेले आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची छाप सोडल्यानंतर प्रवीण तरडे आता टॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'अहो विक्रमार्का' नावाच्या चित्रपटातून प्रवीण तरडे आता टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Pravin Tarde Debut Tollywood : आरारारा खतरनाक.... प्रवीण तरडेची टॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री, लूक बघून ओळखताच येणार नाही!
Pushpa 2 The Rule Release Date : 'पुष्पा २' चित्रपटाची रिलीज डेट बदलली; 'या' तारखेला अल्लू अर्जुन गाजवणार थिएटर; जाणून घ्या...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत "मुख्य खलनायक" म्हणुन माझा प्रवेश... "अहो विक्रमार्का"मध्ये "असुरा" बनून येतोय तुमच्या भेटीला… मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे. असं कॅप्शन देत प्रवीण तरडे यांनी आपल्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, अभिनेत्याचा विचित्र लूक पाहायला मिळत आहे. नजरेत राग, वाढलेले केसं आणि दाढी आणि विचित्र कपडे अशा लूकमध्ये अभिनेता दिसत आहे. प्रवीण तरडे "अहो विक्रमार्का" चित्रपटामध्ये "असुरा" नावाची भूमिका साकारत आहे. तो प्रमुख खलनायक आहे.

"अहो विक्रमार्का" चित्रपटामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता देव गिल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये, मराठी कलाकारांचीही मांदियाळी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित आणि सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, प्रवीण तरडेंनी आजवर मराठी सिनेसृष्टीत प्रवीण तरडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. इतकंच नव्हे तर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही छाप पाडली आहे. आजवर नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमांमधून अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय.

Pravin Tarde Debut Tollywood : आरारारा खतरनाक.... प्रवीण तरडेची टॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री, लूक बघून ओळखताच येणार नाही!
Chandu Champion Collection : साताऱ्याच्या मुरलीकांत पेटकर यांचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना भावला, 'चंदू चँपियन'ची तिकीटबारीवर यशस्वी घोडदौड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com