आजपासून बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ चा मुहूर्त ठाण्यामध्ये पार पडला. या चित्रपटाच्या शुटिंगच्या मुहूर्ताला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, धर्मवीर आनंद दिघे यांचे पात्र साकारणारा अभिनेता प्रसाद ओक यांनी उपस्थिती लावली. यावेळी दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी माध्यमांसोबत संवाद साधला.
आजपासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यावेळी माध्यमांसोबत बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, ‘खरंतर चित्रपटाच्या नावातच चित्रपटाची व्याप्ती आणि व्याख्या आपल्याला पाहायला मिळेल. चित्रपट कोण्या एकाचा नाही, चित्रपट हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा आहे. ‘धर्मवीर एक यशोगाथा’ ने सर्वांचाच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे आयुष्य एकाच चित्रपटातून दाखवण्यासारखे नाही. त्यांच्या चित्रपटाचा सिक्वेल बनवताना आम्ही त्यांच्या आयुष्यातील जे महत्वाचे टप्पे आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.’
‘चित्रपटातून आनंद दिघे यांचे हिंदुत्व आम्हाला जगासमोर आणायचे आहे, तो या चित्रपटाच्या माध्यमातून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. चित्रपटाच्या पहिल्या भागाला फक्त महाराष्ट्रात आणि भारतातच नाही तर परदेशातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ३१ शो, युरोपमध्ये ४५ शो, अमेरिका आणि जपानसह अन्य देशामध्ये या चित्रपटाचे शो झाले होते. ज्या ज्या देशामध्ये मराठी लोकं राहतात त्या देशामध्ये चित्रपटाचे शो होते. पहिल्या भागामध्ये प्रेक्षकांना आनंद दिघे यांच्या जीवनातले पैलू दिसले, आता दुसऱ्या भागामध्ये आनंद दिघे यांचे हिंदुत्व चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणार आहोत.’ असं दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले.
अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. पण आता ‘‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ मध्ये कोण कोणते कलाकार दिसणार हे तरी गुलदस्त्यातच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.