Dharmaveer 2: 'धर्मवीर' पुन्हा येतोय; निर्मात्यांनी केली घोषणा...

२०२२ मध्ये सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे'. या चित्रपटाने बऱ्याच कोटींचा पल्ला गाठत सर्वत्र यशस्वी कामगिरी केली.
Dharmaveer 2 Poster
Dharmaveer 2 PosterSaam Tv
Published On

Dharmaveer 2: २०२२ मध्ये सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे'. या चित्रपटाने बऱ्याच कोटींचा पल्ला गाठत सर्वत्र यशस्वी कामगिरी केली. धर्मवीर आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक कोटींचा पल्ला गाठल्यानंतर चित्रपटाने ओटीटीवरही धुमाकूळ घातला होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची वर्षपूर्ती झाली. या चित्रपटाला २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेतमध्ये शुटिंगसाठी सुरुवात झाली.(Dharmaveer 2 Movie News Updates)

Dharmaveer 2 Poster
Vivek Agnihotri: 'पठान'च्या वादात विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया, 'चेतावनी- हा व्हिडीओ...' म्हणत केली टीका...

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाईंनी वर्षपूर्ती सोहळा दरम्यानचे काही खास क्षणचित्रं सोशल मीडियावर शेअर करत मोठी घोषणा केली. दरम्यान चित्रपटातील सर्व कलाकारांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. "धर्मवीरांच्या अनेक गोष्टी जाणून घेण्याच्या बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत,त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत" अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओकसोबत केली. धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे.

Dharmaveer 2 Poster
Riya Kumari: अभिनेत्रीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, पतीने सांगितला घटनेचा थरार

पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल. पण, चित्रपटाविषयी निर्माते सांगतात, 'धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलदत्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात प्रेक्षकांना कधीही माहित नसणाऱ्या गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत."

मंगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद दिघेंच्या आयुष्यातील गुलदस्त्यात असणारे पैलू या सिनेमातून उलगडतील. दरम्यान या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे. त्यामुळे तरडे आणि ब्लॉकबस्टर सिनेमा असे समीकरण पुन्हा एकदा समीकरण मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com