Vivek Agnihotri: 'पठान'च्या वादात विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया, 'चेतावनी- हा व्हिडीओ...' म्हणत केली टीका...

'पठान' चित्रपटाच्या वादात आणखी एका बॉलिवूड दिग्दर्शकाने उडी घेतली आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत चित्रपटावर टीका केली आहे.
Vivek Agnihotri
Vivek Agnihotri Saam Tv

Vivek Agnihotri: अवघ्या काही दिवसांतच आपण सर्व २०२२ या सरत्या वर्षाला अलविदा करत २०२३ चे धुमधडाक्यात स्वागत करणार आहोत. २०२३ मधील अनेक चित्रपटांची सध्या बरीच चर्चा सुरु झाली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'पठान'. चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित होताच गाण्यासह चित्रपटाला नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले होते.

दीपिकाला भगव्या बिकीनीवरुन सर्वच स्तरातून तिच्यावर टीका केली जात होती. चित्रपटावर अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनीही टीका केली होती.

Vivek Agnihotri
Riya Kumari: अभिनेत्रीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, पतीने सांगितला घटनेचा थरार

त्यानंतर या वादात आता 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी चित्रपटावर ताशेरे ओढले आहे. बॉलिवूड चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या अश्लिलतेवरही विवेक यांनी भाष्य केले आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत, वरील भागात 'बेशरम रंग'या गाण्यातील काही दृश्ये दिसत आहेत. या व्हिडीओत दोन वेगवेगळे दृश्य एकत्र करुन व्हिडीओ शेअर केली आहे.

Vivek Agnihotri
Kangana Ranaut: टुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात कंगना रनौतचे मोठे वक्तव्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'ही' मागणी

यामधील पहिल्या व्हिडीओत चित्रपटातील गाणं दाखवण्यात आले आहे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये एक किशोरवयीन मुलगी गाण्याचे आताच्या पीढीवर होत असलेल्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना दिसत आहे. चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या आशयावर तिने काही आक्षेप घेतला आहे.

सोबतच तिने ओटीटीवर व्यवस्थित कंटेट दाखवण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. ट्वीटवर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, “चेतावनी- हा व्हिडीओ बॉलिवूड विरोधी आहे. जर तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल तर हा व्हिडीओ अजिबात पाहू नका.”

विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी समर्थन करताना दिसत आहे. या पोस्टवर नेटकरी म्हणतात, "खुपच चांगल्या मुद्द्यावर ही चिमुकली बोलली आहे, तिने याच्यावर बोलण्याचं धाडस केलंय." येत्या २५ जानेवारीला 'पठान' चित्रपटाचे प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. मुख्य भूमिकेत चित्रपटात दीपिका- शाहरुखसह जॉन अब्राहम दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com