Alia Bhatt Deepfake Video: कतरिना कैफनंतर आलिया भट्ट डीपफेकची शिकार, व्हिडीओ होतोय व्हायरल

Alia Bhatt Viral Video: रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील डीपफेकची शिकार झाली आहे. अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Alia Bhatt
Alia BhattSaam Tv

Deepfake Video:

डीपफेकने सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे डीपफेकचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील डीपफेकची शिकार झाली आहे. अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होणाऱ्या डीपफेक व्हिडिओमध्ये एका तरुणीने निळ्या रंगाच्या फ्लोरल को-ऑर्ड सेट परिधान केल्याचे दिसत आहे. ती कॅमेऱ्याकडे बघून अश्लील हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडीओतील तरुणीला आलिया भट्टचा चेहरा लावण्यात आला आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे दिसून येईल की व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी आलिया भट्ट नाही. आलिया भट्टचा चेहरा एका तरुणीच्या शरीरावर एडिट करून लावण्यात आला आहे.

Alia Bhatt Deepfake Video
Alia Bhatt Deepfake VideoSaam Tv

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. दरम्यान, आलिया भट्ट ही पहिली सेलिब्रिटी नाही की जी डीपफेकची शिकार झाली आहे. यापूर्वी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कतरिना कैफ आणि काजोलचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Alia Bhatt
Orry Leave Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून ओरीने एका दिवसातच खेळ आटोपला, ‘या’ कारणामुळे त्याला सोडावे लागले घर

दरम्यान, आलिया भट्ट ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तिच्या अभिनयाची शैली तसेच इन्स्टाग्रामवरील तिच्या पोस्ट चाहत्यांना प्रचंड आवडतात. पण आता आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तिचे चाहते चिंतेत आले आहेत. ते यावर राग व्यक्त करताना दिसत आहेत.

Alia Bhatt
Filmfare OTT Awards 2023 Winner: ओटीटी अवॉर्डमध्येही आलिया भट्ट आणि मनोज वाजपेयीची बाजी, ‘जुबली’च्या खात्यात ९ अ‍ॅवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com